Coronavirus : राज्यात ‘कोरोना’ उद्रेक कायम ! गेल्या 24 तासात 61 हजार 695 नवीन रुग्ण, 349 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्यात प्रचंड वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात काल पासून 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. लॉकडाऊन जाहिर करुन देखील रुग्णांच्या संख्ये वाढ होत असल्याने सरकार निर्बंध आणखी कडक करण्याचा विचार करत आहे. राज्यात लसीकरण मोहीम देखील सुरु आहे. मात्र तरी देखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याने, सरकारसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात 61 हजार 695 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 349 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज राज्यात 53 हजार 335 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 29 लाख 59 हजार 056 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.3 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 349 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 59 हजार 153 जणांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.63 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 6 लाख 20 हजार 060 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 1 लाख 12 हजार 923 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 30 लाख 36 हजार 652 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 36 लाख 39 हजार 855 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 15.8 टक्के आहे. सध्या राज्यात 35 लाख 87 हजार 478 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 27 हजार 273 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील प्रमुख शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण