Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चे 48 हजार 621 नवीन रुग्ण, 59 हजार 500 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. राज्यात 50 दिवसानंतर रविवारी (दि.2) कोरोना बाधित रुग्णांची संख्या 50 हजारांच्या खाली आली होती. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णसंख्येत काहीशी घट झाली आहे. आज दिवसभरात राज्यात 48 हजार 621 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

आज राज्यात 59 हजार 500 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 40 लाख 41 हजार 158 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.7 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 567 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 70 हजार 851 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.49 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 6 लाख 56 हजार 870 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 1 लाख 08 हजार 915 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 78 लाख 64 हजार 426 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 47 लाख 71 हजार 022 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 17.12 टक्के आहे. सध्या राज्यात 39 लाख 08 हजार 491 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 28 हजार 593 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.