Maharashtra Talathi Bharati 2023 | सुशिक्षीत बेरोजगारांसाठी खुशखबर ! राज्यात तलाठी पदासाठी 4 हजार 625 जागांची मेगाभरती, शासनाकडून आदेश जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Talathi Bharati 2023 | अखेर राज्य सरकारने तलाठी पदाची मेगाभरती जाहीर केली आहे. तब्बल 4 हजार 625 जागांची तलाठी पदासाठीची मेगाभरती केली जाणार असून यासंदर्भात राज्य सरकारने आदेश देखील काढले आहेत. या आदेशामध्ये मेगाभरती दि. 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक सुशिक्षीत बेरोजगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Maharashtra Talathi Bharati 2023)

राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाकडून आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गटज्ञक) संवर्गातील तब्बल 4 हजार 625 पदांच्या सरळसेवा भरती करिता राज्यातील 36 जिल्ह्यात ऑनलाइन पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा दि. 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचे देखील आदेशात नमुद करण्यात आलेले आहे.

Web Title : Maharashtra Talathi Bharati 2023 | Good news for educated unemployed! Mega recruitment of 4 thousand 625 seats for the post of Talathi in the Maharashtra, order issued by the government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Advt.

हे देखील वाचा

Pune Crime News | नारायणगाव पोलिस स्टेशन – एकाच तरुणीच अनेकांशी विवाह लावून लाखो रुपयांना लुबाडले

Maharashtra Politics News | ‘अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर…’, राष्ट्रवादीच्या आमदाराचा नितेश राणेंवर ‘प्रहार’

Maharashtra IAS Officer Transfer | राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या, वाचा संपुर्ण यादी

Pune Crime News | 10 टक्के व्याजाने घेतलेले पैसे परत केल्यानंतर देखील पैशासाठी तगादा लावणार्‍या सूरज म्हेत्रेविरूध्द खंडणीचा गुन्हा