Maharashtra Politics News | ‘अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर…’, राष्ट्रवादीच्या आमदाराचा नितेश राणेंवर ‘प्रहार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या तिथीनुसार राज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा (Raigad Shivrajyabhishek Sohala) साजरा करण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि शिवप्रेमी उपस्थित होते. या सोहळ्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) आणि भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांच्या ट्विटर वॉर सुरु झाले आहे. (Maharashtra Politics News)

 

ट्वीट करत मिटकरी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा सनातन धर्म (Sanatana Dharma) प्रचारासाठी होता का? छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं राज्य हे सनातनी नव्हतं. ते रयतेच स्वराज्य होतं! तुम्ही परत परत चुक करताय. तुमचा टकमकी वरून लवकरच जनता कडेलोट करेल. (Maharashtra Politics News)

 

सत्तेचा गैरवापर करुन…

ज्या सनातनी प्रवृत्तीने शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला त्यांनाच डोक्यावर घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सत्तेचा गैरवापर करुन तिथीनुसार हा कार्यक्रम राबवलाय. महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता याचं चोख उत्तर देईल. तुम्ही रायगडाच्या पवित्र भुमित सनातनी सत्तेचा उन्माद केलाय, अशी टीका मिटकरी यांनी राज्य सरकारवर केली आहे. याला भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना…

नितेश राणे म्हणाले, अमोल मिटकरी हे फार लहान आहेत. कारण ते चेकशिवाय बोलत नाहीत. मला याचा अनुभव आहे. अमोल मिटकरी यांच्यात हिंमत असेल, तर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) जाऊन सांगाव की, एकच शिवजयंती साजरी करावी. मग पुढचा चेक माझ्या नावाने देतो. माझा चेक क्लीअर होतो, बाउन्स होत नाही, असा टोलो राणे यांनी लगावला.

 

अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर…

नितेश राणेंच्या टीकेला मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर सनातन्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला का विरोध केला? शिवाजी महाराजांना धर्म शुद्धीचा अधिकार नाही असे सनातन्यांनी का म्हटले? व गागाभट्टाला काशीवरून का बोलावले? या प्रश्नाचे उत्तर तेवढे दे माझाही बाउन्स न होणारा चेक तुला देतो.

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | amol mitkari attacks nitesh rane over chhatrapati shivaji maharaj raigad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा