Maharashtra TET Scam | शिक्षक पात्रता चाचणी घोटाळा प्रकरणात ED कडून मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणाचा (Maharashtra TET Scam) तपास ईडीकडे (ED) सोपवण्यात आला आहे. या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंग (Money Laundering) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणात (Maharashtra TET Scam) माजी मंत्री आणि शिदे गटाचे मोठे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या दोन मुली आणि एका मुलाचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात ईडीने गुन्हा (FIR) दाखल केल्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

ईडीने रविवारी टीईटी परीक्षा, आरोग्य विभाग परीक्षा, म्हाडा परीक्षेशी (Mhada exam) संबंधित पुणे पोलिसांकडे (Pune Police) दाखल झालेल्या घोटाळ्यांची माहिती मागवली. शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी जारी करण्यात आली. यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावे असल्याचे समोर आले. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख (Heena Kausar Abdul Sattar Sheikh) आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख (Uzma Nahid Abdul Sattar Sheikh) ही नावे यादित असल्याचे समोर आले आहे.

सत्तारांकडून चौकशीची मागणी

अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांचं टीईटी प्रमाणपत्र (TET Certificate) रद्द करण्यात आल्याची बाब उजेडात आली.
मात्र बदनामीसाठी हा सगळा कट रचल्याचा पलटवार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
आमची चूक असेल तर आमच्या मुलांवर कारवाई करा. नसेल तर हे सर्व करणाऱ्यांना फासावर लटकवा, असं सत्तार यांनी म्हटलं.
राज्यातील टीईटी घोटाळा प्रकरणाची (Maharashtra TET Scam) नीट चौकशी व्हावी.
कुणाचीही बदनामी करण्याचं काम कुणी करु नये. चुकीची माहिती देऊन बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सत्तार यांनी केली.

 

Web Title : – Maharashtra TET Scam | enforcement directorate ed registers money laundering case in maharashtra tet scam case pune police

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा