Maharashtra Unlock | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स रात्री 12 पर्यंत सुरू राहणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन Maharashtra Unlock | मागील दिड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व व्यवहार ठप्प झाला होता. मागील काही महिन्यापासून कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने राज्य सरकारने (Thackeray government) हळूहळू सर्व व्यवहार सुरू (Maharashtra Unlock) करण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभुमीवर हाॅटेल, रेस्टॉरंट्स (Hotels, restaurants) आता रात्री 12 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला आहे.

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) आता विविध आस्थापने पुन्हा सुरू करण्याची आणि कामं करण्याची परवानगी दिली आहे.
दरम्यान, कोरोनाचे नियम पाळून, कोविड योग्य वर्तनाचे निष्ठुर पालन, सेवा प्रदात्यांची तसेच अभ्यागतांची पूर्ण लसीकरण करण्याची आवश्यकता, व्यापारावर निर्बंध इत्यादी निर्बंध लादण्यात आले आहेत.
सध्या सनाचा हंगाम असल्याने लोकांना खरेदीसाठी, त्यांच्या सोयीसाठी या दुकाने, हाॅटेलच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात (Maharashtra Unlock) आला आहे.

दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील रेस्टॉरंट रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
यासोबतच इतर दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
यासोबतच त्यासंदर्भातील कार्यपद्धती आणि मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, रेस्टॉरंटमधील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसींचे (Corona vaccination) दोन्ही डोस घेतलेले आवश्यक आहे फेस मास्क अनिवार्य आहे सॅनिटायझरचा वापरही अनिवार्य (Maharashtra Unlock) आहे.

 

Web Title : Maharashtra Unlock | hotels and restaurants allowed to continue until 12 at night in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | कौटुंबिक हिंसाचाराच्या खटल्यातून प्रेयसीला वगळण्याचे आदेश

The Big Picture | डोक्यावर पगडी घालून ‘घुमर’ गाण्यावरती थिरकला रणवीर सिंग; तुम्ही पहिला व्हिडीओ ?

Rakesh Jhunjhunwala | कमाईची सुर्वणसंधी ! SEBI ने 6 कंपन्यांच्या IPO ला दिली मंजूरी, जमवणार 12 हजार कोटी रुपये