Maharashtra Unlock । राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Unlock । कोरोनाच्या (Corona virus) दुसऱ्या लाटेने नागरिकांना हतबल करून सोडलं आहे. रुग्णाची संख्या वाढत होती तेव्हा लोकांच्या मनात एकच धास्ती निर्माण झाली होती. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने (State Government) कडक निर्बंध लागू केले. नंतर काही प्रमाणात परिस्थिती आटोक्यात आल्याने शासनाने कडक निर्बंध शिथिल केले आहेत. काही जिल्ह्यात चिंताजनक स्थिती असल्याने तेथील निर्बंध कायम ठेवले आहेत. आता मात्र, महाराष्ट्र टप्प्याटप्प्याने अनलॉकच्या (Maharashtra Unlock) दिशेने जाणार असल्याचे संकेत राज्य सरकारकडून मिळत आहेत. आजच्या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे राज्याला ‘ओपनिंग अप’कडे (Opening Up) नेण्याचा निर्णय घेत आहेत.

राज्यात लवकरच टप्याटप्याने अनलॉकची (Unlock) प्रक्रिया सुरू होणार आहे. कोरोनाचे निर्बंध हटवण्यासाठी राज्य सरकार (State Government) ‘ओपनिंग अप’चा (Opening Up) मंत्र अवलंबणार असल्याचे समजते. या अंतर्गत आगामी आठवड्यांपासून निर्बंधात असलेलं राज्य टप्प्याटप्याने अनलॉक होईल. याबाबत एक अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आला आहे. दरम्यान, कोणकोणते कोरोनावरील निर्बंध कशा पद्धतीने हटवून सवलती देण्याबाबत अहवाल टास्क फोर्सने याबाबत मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. तर या आठवड्यात टास्क फोर्स सदस्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत अहवालावर चर्चा होवून टप्याटप्याने निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.

ADV

राज्यात गेली दोन महिन्यापासून असलेले बंधने आता मोकळे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी 7 जुलै रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) आणि जिल्हाधिकारी (Collector) यांच्यासमवेत महत्वाची बैठक घेतली होती. नंतर 9 जुलै रोजी राज्य आपत्कालीन विभागातील अधिकाऱ्यांसोबत देखील बैठक घेण्यात आली. राज्यातील निर्बंध शिथिल करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. यांनतर, मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्य टाक्स फोर्समधील (Tax force) तज्ज्ञ डॉक्टर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून रिपोर्ट मागितला होता. यानुसार आता मुख्यमंत्री ठाकरे हे राज्यातील निर्बंध टप्याटप्याने कमी करून राज्य ‘ओपनिंग अप’कडे नेण्याचा निर्णय घेत आहेत.

 

‘ओपनिंग अप’ नुसार काय असेल सूट –

– टप्याटप्याने सर्व आस्थापना सुरू करण्याचा प्लॅन तयार असून वेळ वाढवण्याबरोबरच उपस्थितीची मर्यादाही शिथील केली जाणार आहे.

– अशा आस्थापनांमध्ये लसीकरण झालेल्यांना उपस्थितीमध्ये प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आहे.

– सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय मात्र लगेच घेतला जाणार नसल्याची सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

पहिल्या टप्यात काय असणार सूट –
हॉटेल, रेस्टॉरंट उघडण्यासाठी सवलती जाहीर केल्या जाणार आहेत. यात रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची वेळ रात्री 10 पर्यंत केली जाणार असून, 50 टक्केची मर्यादाही काही प्रमाणात शिथिल केली जाण्याची शक्यता आहे. यासाठी हॉटेलमधील सर्व कर्मचा-यांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक. तर लसीकरण झालेल्या ग्राहकांना रेस्टॉरंट प्रवेशात प्राधान्य देण्याबाबत विचार सुरू आहे. शक्य असेल तिथे बंदिस्तऐवजी मोकळ्या जागांमध्ये डायनिंगची व्यवस्था हॉटेलना करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.

Web Titel :- Maharashtra Unlock | maharashtra state unlock will start from next week thackeray government is planning for opening up

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lightning | वीज कोसळल्याने देशात 78 लोकांचा गेला बळी; पीएम मोदींनी केली आर्थिक मदतीची घोषणा

Smartphone | जर तुमची मुले सुद्धा जास्त मोबाइल पहात असतील तर ‘या’ 6 टिप्सचा करा वापर, जाणून घ्या

Thane Crime News | धक्कादायक ! चक्क रक्ताचा टिळा लावून केला प्रेमाचा बनाव, विवाहित तरूणाचे युवतीवर लैंगिक अत्याचार