×
Homeताज्या बातम्याMahavitaran Bharti 2021| 'इथं' महावितरणमध्ये मोठी भरती, जाणून घ्या सविस्तर

Mahavitaran Bharti 2021| ‘इथं’ महावितरणमध्ये मोठी भरती, जाणून घ्या सविस्तर

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड लातूर (Maharashtra State Electricity Distribution Company Limited Latur) याठिकाणी लवकरच काही जागांसाठी भरती (Mahavitaran Bharti 2021) प्रक्रीया राबवली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना (Notification issued) जारी करण्यात आली आहे. अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन, वायरमन) या पदांच्या 101 जागांसाठी ही भरती (Mahavitaran Bharti 2021) केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज (Apply online) करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 असणार आहे.

 

या पदांसाठी होणार भरती

अपरेंटिस इलेक्ट्रीशियन (Apprentice in Electrician)

अपरेंटिस वायरमन (Apprentice in Wireman)

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
अपरेंटिस इलेक्ट्रीशियन (Apprentice in Electrician) – या पदासाठी (MSEDCL Recruitment) अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी उत्तीर्ण केलं असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी संबंधित पदानुसार ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

 

अपरेंटिस वायरमन (Apprentice in Wireman) – या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी उत्तीर्ण केलं असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी संबंधित पदानुसार ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. (Mahavitaran Bharti 2021)

अशी होणार निवड

31 डिसेंबर 2021 पर्यंत प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी 20 जानेवारी 2022 रोजी केली जाईल.

यामध्ये कागदपत्रांची छाननी केली जाईल.

जे उमेदवार यासाठी उपस्थित राहणार नाहीत अशा उमेदवारांचा भरतीसाठी विचार केला जाणार नाही.

उमेदवारांनी मंडल कार्यालय, जुने पावर हाऊस, साळे गल्ली, लातूर या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.

उमेदवारांना ओरिजिनल कागदपत्रांसह झेरॉक्सही आणणे गरजेचे आहे.

 

महत्त्वाच्या सूचना

या भरतीसाठी प्रशिक्षणाचा कालावधी हा एक वर्षाचा असेल.

निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणाच्या कालावधीत Stipend दिला जाईल.

या भरतीसाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

 

ही कागदपत्र आवश्यक

बायोडेटा (Resume)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्र

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधार कार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

 

नोटिफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1qc11gx5cTe4wTwl7UFJPwQu1iPhQRt_d/view

 

ऑनलाईन अर्ज करण्यसाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.apprenticeshipindia.gov.in/

 

Web Title :- Mahavitaran Bharti 2021 Latur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau Thane | 50 हजार रुपयांच्या लाच प्रकरणी ‘उत्पादन शुल्क’मधील अधिकाऱ्यासह दोघे अँटी करप्शनच्या जाळ्यात

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 877 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

SCSS | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुमच्यासाठी ठरू शकता लाभदायक ! केवळ पाच वर्षाच्या मॅच्युरिटीवर देईल 14 लाख रुपये; जाणून घ्या

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News