Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 877 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांच्या दैनंदिन संख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. राज्यात आज 877 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) नोंद झाली आहे. तर 632 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत राज्यात 64 लाख 95 हजार 249 रुग्णांनी मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.72 टक्के आहे.

 

राज्यात आज 19 रुग्णांच्या मृत्यूची (Death) नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 317 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर (Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे. राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या (Active Patient) संख्येत घट झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण काहींसा कमी झाला आहे. सध्या राज्यात 6 हजार 693 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 73 लाख 06 हजार 860 प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये 66 लाख 46 हजार 938 जणांना कोरोनाची बाधा (Corona infection) झाली आहे.
रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 9.48 टक्के इतके आहे.
सध्या राज्यात 77 हजार 371 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत.
तर 839 लोक संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये (institutional quarantine) उपचार घेत आहेत.

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Corona 877 new patients in state in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Anil Parab | अनिल परब यांची सुरक्षा वाढवली; जाणून घ्या कारण

SCSS | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुमच्यासाठी ठरू शकता लाभदायक ! केवळ पाच वर्षाच्या मॅच्युरिटीवर देईल 14 लाख रुपये; जाणून घ्या

Rytasha Rathore Topless Photos | छोट्या पडद्यावरील रिताशा राठोडनं इंस्टाग्रामवर शेअर केले टॉपलेस फोटोज्, तिच्या न्यूड फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा