महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे भर पावसातील कर्तव्याचे कौतुकच!

पुणे : पाेलीसनामा ऑनसाईन

कालपासून राजा बहादूर मिल रस्त्यावरील रेल्वे क्वॉटर्स बाहेर महावितरणचा असणारा इलेक्ट्रिक ट्रॉन्सफॉर्मर पडलेल्या अवस्थेत होता. त्याठिकाणी ये-जा करणारे नागरिक व रहिवाशी यांनी महावितरणशी संपर्क ही साधला. परंतू, या सर्व प्रकारात एक दिवस उलटला. त्यानंतर आज सो़शल मिडीयावर याबाबतचे चित्र सकाळी वॉटसअप, फेसबुक, इन्स्टावर व्हायरल झाले. ट्विटरच्या माध्यमातून पुणे पोलिसांना ही कळविण्यात आले.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’98bcc627-8905-11e8-97d8-f3cc6aa2af5c’]

सोशल मिडियाचा प्रभाव व पुणे पोलिसांनी तातडीने महावितरणचे अधिकारी श्री. कुलकर्णी यांना संपर्क साधून दिलेली खबरीची दखल लगेच घेतली गेली. महावितरणचे कर्मचारी लगेचच दुपारी अकरा वाजल्यापासून कामाला लागले. मुसळधार पाऊस पडत असताना देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी पडलेला ट्रॉन्सफॉर्मर उभा करुन रात्रीपर्यंत कर्तव्य बजावून महावितरणच्या या पथकाने चोख काम बजावले. पावसात सलग आठ दहा तास काम करुन काम पुर्ण केल्याने रहिवाशांनी त्यांचे कौतुक करत आभार मानले.

याप्रकरणी सकाळी सोशल मिडीयावर व पोलिसांना ट्विटरच्या माध्यमातून अग्निशमन दलाचे जवान निलेश महाजन यांनी माहिती कळविली होती. महावितरणचे कर्मचारी त्यांची कर्तव्य तत्परता तसेच पुणे पोलिसांनी ट्विटची घेतलेली दखल याविषयी अग्निशमन जवान महाजन यांनी समाधान व्यक्त केले.