लवकरच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढील दिशा ठरवणार: महेश शिंदे 

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास अाठवले  यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन दिनांक 28 मे (सोमवार) रोजी करण्यात आले होते.  यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट तसेच सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, महापाैर मुक्ता टिळक,  रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष महेश शिंदे यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपल्याला व्यासपीठावर बोलायला संधी दिली नाही म्हणून महेश शिंदे व्यासपीठ सोडून निघून गेले होते. यावर रामदास आठवले  यांनी देखील चांगलीच टिका केली होती. कोणी जर कार्यक्रमात भाषण करण्याची संधी दिली नाही म्हणून जात असेल तर त्यांनी सावकाश जावे. एक जण माझ्या पक्षातून गेला तर लाखो कार्यकर्ते रोज माझ्या पक्षात येत आहेत. असे  म्हणत त्यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले होते.

मात्र आता याच विषयावर महेश शिंदे यांनी  पत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.  ते म्हणतात माझ्या नेतृत्वाखाली आपल्या अनेक मागण्या घेऊन हजारो कामगार अधिवेशनात आले होते. या मागण्यासंदर्भात कामगार म्हणत होते की आपण या मागण्या भाषणाच्या माध्यमातून आठवले साहेबांच्या समोर मांडाव्यात .यावेळी कामगारांच्या आग्रहावरुन महेश शिंदे हे वारंवार रामदास आठवले व व्यासपीठावरील प्रमुख कार्यकर्त्यांना बोलू देण्याची विनंती करत होते. परंतू त्यांच्या मागण्याकडे यावेळी  जाणून बुजून दुर्लक्ष केले गेले. त्यानंतर महेश शिंदे यांनी  कामगारांच्या मागण्या व्यासपीठावरुन मांडू न दिल्यामुळे व्यासपीठावरुन उठून हजारो कार्यकर्त्यांसह बाहेर पडले. यावेळी मुख्य प्रवेशद्वारावर निदर्शने केली व कामगारांच्या संदर्भात आपण लवकरच निर्णय घेऊ असे सांगितले.
दरम्यान महेश शिंदे हे रामदास आठवले यांचे अतिशय जवळचे कार्यकर्ते म्हणून अोळखले जातात. मी रामदासजी आठवले व आरपीआय पक्षाचा अतिशय मनापासून आदर करतो आहे. मात्र 28 मे (सोमवार) रोजी सर्व दैनिक पेपर मधील बातम्यामध्ये महेश शिंदे यांना भाषण करु न दिल्यामुळे ते व्यासपीठावरुन निघून गेले अशी चुकिची माहिती देण्यात आली. असे महेश शिंदे म्हणाले.
मी गेल्या अनेक दिवसापासून विविध ठिकाणी कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रयत्न करतो आहे. त्यामुळे केवळ एका ठिकाणी मला भाषण करु न दिल्यामुळे मी नाराज होणारा कार्यकर्ता नाही असेही यावेळी  बोलताना  शिंदे म्हणाले.  आपण लवकरात लवकर  पत्रकार परिषद घेवून पुढील कार्याची दिशा ठरवणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
यावेळी अनिल मोरे, प्रदिपभाऊ कांबळे, अरुण जगताप, संदेश साळवे, रामभाऊ कर्वे, बापू शिंदे, गाैतम माने, अमित कडाले, बाबुरावजी घाडगे, हनुमंत गायकवाड, सिद्धार्थ म्हस्के, चंद्रकांत माने, रमेश परशुराम कांबळे, पदमा शिरसाठ, यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.