ऊस उत्पादकांसाठी खुशखबर ! मोदी सरकार देणार ‘सबसिडी’, थेट बँक खात्यात जमा होणार रक्कम, जाणून घ्या

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेत केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठक पार पडल्यानंतर कॅबिनेट बैठकीत झालेले निर्णयाबद्दल माहिती दिली. यात सर्वात महत्वाचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला तो म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 60 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीवर सबसिडी देण्याचा आणि ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे –
सरकारकडून आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांसबंधित महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 60 लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्यावर एक्सपोर्ट म्हणजेच निर्यात सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात 6 हजार 268 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येणार आहे. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. प्रकाश जावडेकर म्हणाले की या निर्णयाने साखरेच्या किंमती नियंत्रणात येतील आणि शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.

ADV

जावडेकर म्हणाले की, अतिरिक्त स्टॉकचा विचार करता शुगर एक्सपोर्ट पॉलिसीला 2019 – 20 च्या सीजनसाठी मंजूरी देण्यात आली आहे, जवळपास 60 लाख टन साखर निर्यात चालू वित्त वर्षात करण्यात येईल. ते म्हणाले की, शुगर एक्सपोर्ट सब्सिडीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.

आरोग्यविषयक वृत्त –