मलायका अरोराच्या ‘बिधनास्त’ आणि ‘कडक’ फोटोमुळं सोशलवर ‘आग’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या फोटोंमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेचा हिस्सा बनलेली असते. अर्जुन कपूरच्या रिलेशनला घेऊन ती कधी चर्चेत असते तर कधी आपल्या हटके फॅशनमुळे ती चर्चेत असते. नुकतीच मलायका वेगा ब्युटी अवॉर्डमध्ये दिसली होती. यानंतर तिचे काही फोटो समोर आले आहेत जे सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

वेगा ब्युटी अवॉर्ड फंक्शनमध्ये व्हाईट कलरचा हाय स्लीट गाऊन घातलेली मलायका खूप हॉट दिसत होती. मलायकाच्या या बोल्ड आणि ग्लॅमरस अवताराचे कौतुक होताना दिसत आहे.

रेड लिपस्टिक आणि हाय हिल्समुळे मलयाकाच्या सौंदर्याला चार चांद लागले. या संपर्ण कार्यक्रमात मलायका आकर्षणाचा बिंदू बनली होती. इतकेच नाही तर ब्लॅक आणि गोल्डन कलरच्या गाऊन घालून मलायकाची बहिण अमृता अरोरानेही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मलायकाने इंस्टाग्रामवरून शेअर केलेले तिचे फोटो सध्या सोशलवर राडा घालताना दिसत आहेत.

या फोटोंची खास बात अशी की, अर्जुन कपूरच्या मलायकाच्या फोटोवरील खास कमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. फायर इमोजी पोस्ट करत अर्जुनने मलायकाच्या फोटोवर कमेंट केली आहे. जणू आग लावणारे तिचे फोटो आहेत असेच त्याने म्हटले आहे. अर्जुनच्या कमेंटवरूनही त्याचे मलायकाप्रति प्रेम दिसून येते.

 

Visit : Policenama.com