मलायकापासून अरबाज वेगळा झाल्यानंतर संतापून म्हणाला – ‘लग्न करेन धुमधडाक्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे सध्या चर्चेत असणारे कपल म्हणजे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर. सगळ्यांनाच माहित आहे की हे एकमेकांना डेट करत आहे तर अरबाज खान जॉर्जियाला डेट करत आहे. अलीकडेच जेव्हा इटालियन मैत्रीण जॉर्जियाबरोबर लग्नाचा प्रश्न विचारला गेला तेव्हा अरबाज खानला थोडा राग आला. यावर अरबाज संतापला आणि म्हणाला, अद्याप लग्न करण्याचा त्याचा कोणताच प्लॅन नाही.

अरबाज पुढच्या वर्षी गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत लग्न करणार आहे. एका मुलाखतीमध्ये अरबाज म्हणाला की, ‘मी लग्न करेन आणि तेही धुमधडाक्यात करेन.’ अरबाज खान आणि मलाइका अरोरा एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर ते त्यांच्या स्वतःच्या जगात आनंदी आहेत. नेहमी मलायका आणि अरबाज त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल नेहमीच वेगवेगळे प्रश्न विचारले जातात.

घटस्फोट झाल्यापासून मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अर्जुन आणि मलायका त्याचबरोबर जॉर्जिया आणि अरबाज एकत्र स्पॉट होत असतात. मलायका आणि अर्जुन परदेशात फिरायला जात असतात. काही दिवसांपूर्वी अर्जुनने आपल्या इन्स्टाग्रामवरून मलायकासोबतचे काही फोटोही शेअर केले होते. ज्यामध्ये त्यांची बॉन्डिंग दिसून आली. हे दोघे नेहमी आपल्या वॅकेशनचे फोटो शेअर करत असतात. लवकरच हे कपल लग्न करत असल्याची ही चर्चा आहे.