मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) खूपच चर्चेत आहेत. अनेक वर्षापासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. तर ते लवकर लग्न बंधनात अडकतील अशा अफवाही सुरू होत्या. चाहते सुद्धा आता त्यांच्या लग्नासाठी उत्सुक झाल्याचे दिसून येत होते. अलीकडेच एका मुलाखतीत अभिनेत्रीने (Malaika Arora) लग्न या विषयावर भाष्य केले आहे.
मलायका (Malaika Arora) सध्या अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी ती अनेक पार्टी आणि जिम मध्ये दिसत असते. त्यामुळे ती कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने एका कार्यक्रमात उपस्थिती लावत लग्नाबद्दल आपले विचार मांडले आहे. यावेळी ती म्हणाली, “लग्न म्हणजे सर्व काही आहे का? लग्न हे दोन व्यक्ती ठरवून चर्चा करून ठरवण्यात येणारी गोष्ट आहे. जर आपल्याला त्यात अडकायचे असेल तर आपण त्यात स्वतःला झोकून देऊ, त्याचा विचार करू आणि त्याबद्दल बोलू. मात्र सध्या आम्ही आमच्या जीवनावर प्रेम करत आहोत. सध्या आम्ही आमच्या प्री-हनिमूनच्या टप्प्याचा आनंद घेत आहोत”.
मलायकाचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे.
2017 मध्ये मलायकाने पती अरबाज खान पासून घटस्फोट घेतला होता आणि 2019
मध्ये तिने अर्जुनला डेट करत असल्याची कबुली दिली होती.
मात्र गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अरबाज खान (Arbaaz Khan) यांचा मुलगा अरहान याचे
अर्जुन खानशी चांगले बॉन्डिंग नसल्यामुळे तो आता वडील अरबाज खान बरोबर राहत असल्याचे बोलले जात आहे.
Web Title :- Malaika Arora | Finally, actress Malaika commented on her marriage with Arjun; Said “Is marriage everything?…..”
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chhagan Bhujbal | ‘फडणवीसांना ‘या’ पदावर बघायला आवडेल’, छगन भुजबळांनी सांगितली ‘मन की बात’
Pune Crime News | शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून आरोपीचा पलायन करण्याचा प्रयत्न, पण…