‘पर्पल’ लूकमध्ये मलायकाचा ‘ग्लॅमरस’ तडका, कातिलाना अंदाज पाहून चाहते ‘घायाळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची फिटनेस क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मलायका अरोराचे फॅशन, स्टाइल आणि तिचा स्वॅग नेहमीच चर्चेत राहिला आहे. कॅज्युअल आउटिंग किंवा पार्टीमध्ये मलायका आपल्या बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहे. ज्यामध्ये ती तिचा बोल्डनेस फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

मलायकाचे हे फोटो तिने स्वत: आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. फोटो शेअर करुन मलायकाने लिहले की, ‘हाथों से बात.. क्योंकि मैं सुन नहीं रही।’ तिचे हे फोटो सोशल मीडियावर तेजीने व्हायरल होत आहे. चाहत्यांना तिचे फोटो खूप पसंतीस पडत आहे. तिच्या फोटोंना चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

मलायकाच्या लूकबद्दल बोलायचे म्हणले तर तिने पर्पल कलरचा शायनी पॅंटसूट परिधान केला आहे. या लूकसोबत अभिनेत्रीने इअररिंग्स घातले आहे. मस्कारा आईज, न्यूज लिप्स आणि मोकळ्या केसासोबत तिने तिच्या लूकला आणखी आकर्षित केले आहे. लूकला कॅरी करताना तिने कातिलाना अंदाजात पोज दिले आहे.

मलायका सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिच्या प्रत्येक लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांची पसंती मिळते. तिचे इन्स्टाग्रामवर 10 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक फोटोला लाखापेक्षा जास्त लाइक्स आणि हजारोंपेक्षा जास्त कमेंट येत असतात.