पश्चिम बंगालचं नाव बदलण्याची ममता बॅनर्जींची PM मोदींकडे मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील वाद शिगेला पोहचला होता. निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी पश्चिम बंगालचे नाव बदलण्याची मागणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवरात्रीनंतर पश्चिम बंगाल भेटीचे आमंत्रण दिले. ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते.

ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांना कुर्ता आणि मिठाई भेट दिली. त्यांनंतर झालेल्या चर्चेदरम्यान बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचे नाव बदलण्याची मागणी केली. पंतप्रधानांनी पश्चिम बंगालचे नाव बदलण्याचे आश्वासन दिल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. तसेच त्यांनी राज्यासाठी 13 हजार 500 कोटी रुपयांचा निधीची मागणी केली. तसेच एनआरसी आसाम कराराचा भाग होता. इतर ठिकाणी त्याची तरतूद नव्हती याच्याकडे देखील पंतप्रधानांचे लक्ष वेधल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट राजकीय नसल्याचे सांगत त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्याची इच्छा बोलून दाखवली. अमित शहा यांनी वेळ दिल्यास उद्या त्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवरात्रीनंतर पश्चिम बंगालमध्ये येण्याचे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या कोल ब्लॉकच उद्घाटन करण्याचे निमंत्रण दिले.

Visit – policenama.com