Pune News : आंबेगाव खुर्द येथे गोळीबार करणाऱ्या आरोपीला अंबेजोगाईतून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार (Firing) करुन दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला अंबेजोगाई (Ambejogai) येथे अटक (Arrest) करण्यात आली आहे. ही कारवाई भारती विद्यापीठ पोलिसांनी केली असून आरोपीने तडीपारीचा भंग करुन हा गुन्हा केला होता. ही घटना 10 डिसेंबर रोजी रात्री आंबेगांव खुर्द (Ambegaon Khurd) येथील हनुमाननगर परिसरात घडली होती. कृष्णा बबन लोखंडे (रा. शनिनगर, आंबेगांव खुर्द) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीने पूर्ववैमनस्यातून दोन ते तीन गोळ्यांचे राऊंड फायर केले होते. या प्रकरणात 16 ते 17 जणांच्या टोळ्याक्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात सिद्दीकी मौला शेख (वय-18 रा. शनिनगर, आंबेगाव खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख आणि आरोपी गणेश पवार यांची किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते. याच रागातून पवार याने शेख याच्यावर त्याच्याकडे असलेल्या बंदूकीतून दोन ते तीन गोळ्या फायर केल्या. तसेच त्याचे साथिदार विशाल सोमवंशी, विनोद सोमवंशी, कृष्णा लोखंडे यांच्यासह इतरांनी शेख याच्या दिशेने दगडफेक करुन परिसरात दहशत निर्माण केली होती.

या गुन्ह्यातील आरोपी कृष्णा लोखंडे हा बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे लपल्याची माहिती भारती पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख, विक्रम सावंत आणि सचिन पवार यांना समजली. त्यानुसार पथकाने अंबेजोगाई येथे जाऊन आरोपी लोखंडे याचा शोध घेऊन अटक केली.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे, उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस अंमलदार संतोष भापकर, सोमनाथ सुतार, रविंद्र भोसले, सर्फराज देशमुख, सचिन पवार, अभिजित जाधव, गणेश शेंडे, विक्रम सावंत यांनी केली.