एटीएम घोटाळा प्रकरणी एकजण ताब्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – एटीएम मशीनमध्ये पैसे भरणा करणाऱ्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी पन्नास लाखांचा घोटाळा पुढे आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अक्षयकुमार पाटील रा. आष्टा याला ताब्यात घेतले आहे. तर हितेश नरसिंह पटेल (रा. शिंदे मळा, सांगली) याच्या शोधासाठी सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात छापे मारण्यात आले आहेत. तसेच संशयितांच्या नातेवाईकांकडेही चौकशी केली जात आहे.

३४ बॅंकांच्या एटीएम मशीनमध्ये पैसे भरणा करण्याचा ठेका सीएमएस इन्फो सिस्टीम कंपनीकडे आहे. कंपनीचे प्रतिनिधी हितेश पटेल व अक्षकुमार पाटील याच्याकडे सांगली-मिरज आणि जयसिंगपूरमधील अकरा एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम होते. संशयित पटेल गेल्या बारा वर्षांपासून हे काम करतो. त्यामुळे त्यातील बारकावे त्याला माहीत होते. एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी पासवर्ड घेवून तो पैसे काढून घेत असल्याचे समोर आले आहे.

त्यांनी जयसिंगपूरमधील स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे मशीन, सांगलीतील पटेल चौकातील बॅंक ऑफ बडोदाचे दोन एटीएम, माधवनगर आणि झुलेलाल चौकातील स्टेट बॅंक इंडियाचे एटीएममध्ये त्यांनी वेळोवेळी पैसे भरणा करताना लूट केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार त्याच्या शोधासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत.

आरोग्यविषयक वृत्त