चक्क बॉसच्या पत्नीला ‘अश्लील’ फोटोंवरून केलं ‘ब्लॅकमेल’, पुढं झालं ‘असं’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉसच्या पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पैशांसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे बॉसच्या पत्नीबरोबर प्रेमसंबंध होते. नवऱ्याला प्रेमसंबंधांबद्दल सर्व काही सांगेन अशी धमकी देऊन आरोपीने महिलेकडून आतापर्यंत २.२५ लाख रुपये उकळल्याची माहिती पोलिसांनी दिली. महिलेने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांना तत्काळ आरोपीला अटक केले आहे. आरोपी हा मूळचा गुजरातमधील रहिवासी आहे.

आरोपीला याआधी गुजरातमध्ये बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली होती अशी माहिती पोलिसांनी दिली. जामीन मिळाल्यानंतर आरोपी मुंबईमध्ये येऊन नाव बदलून राहत होता. आपले आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

सुरुवातील तो महिलेचा पाठलाग करायचा व आपण तुझ्याबद्दल किती गंभीर आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न करायचा. स्वतःचे जीवन संपवून घेईन अशा जबरदस्तीने त्याने मला मैत्री करायला भाग पाडले असे त्या महिलेने पोलिसांना सांगितले. नंतर त्याने महिलेला आक्षेपार्ह फोटोवरून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like