HIV ग्रस्त रूग्ण पुर्णपणे झाला ‘तंदुरूस्त’, जाणून घ्या कशा पध्दतीनं झाला ‘इलाज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  एचआयव्हीतून पूर्णपणे बरा झालेल्या व्यक्तीने आपली ओळख सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी तो लंडन पेशंटच्या नावाने ओळखला जात होता. एचआयव्हीतून पूर्णपणे बरा होणार्‍या या व्यक्तीचे नाव अ‍ॅडम कॅस्टिलेजो आहे.
अ‍ॅडम जगातील दुसरा असा व्यक्ती आहे, जो एचआयव्हीतून पूर्ण बरा झाला आहे. एचआयव्हीतून ठिक होणार्‍या पहिल्या व्यक्तीचे नाव आहे टिमोथी ब्राउन. त्यांना बर्लिन पेशंटच्या नावाने जग ओळखते.

यापूर्वी 2008 मध्ये टिमोथी एचआयव्ही मुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली होती. टिमोथी आणि अ‍ॅडम, दोघांचा आजार एकाच उपचार पद्धतीने बरा झाला आहे.

सोमवारी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये 40 वर्षांच्या अ‍ॅडमने आपली ओळख जाहीर केली. अ‍ॅडमचे म्हणणे आहे की, त्याला अपेक्षांचा राजदूत व्हायचे आहे, यासाठी त्याने आपली ओळख सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला. अ‍ॅडम मागच्या वर्षी एचआयव्हीमुक्त घोषित करण्यात आले होते.

18 महीन्यापर्यंत antiretroviral थेरेपी थांबल्यानंतर सुद्धा अ‍ॅडमच्या शरीरात व्हायरस सापडला नव्हता. अ‍ॅडमने सांगितले की, त्याला 2003 पासूनच एचआयव्ही झाला होता.
ब्लड कँसर बरा करण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट केले जाते. याच पद्धतीने अ‍ॅडम एचआईव्हीमुक्त झाला आहे. परंतु, सर्व एचआयव्ही रूग्णांसाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे सुरक्षित ठरू शकत नाही.

2012 मध्ये समजले की, अ‍ॅडमला Hodgkin lymphoma (एक प्रकारचा कॅन्सर) नावाचा आजार आहे. यानंतर त्याचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यात आले.