काय सांगता ! होय, गर्लफ्रेंडनं केलं KISS, तरुणाने केला कोट्यावधींचा दावा

लंडन : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या आवडत्या व्यक्तीला किस करणं ही एक अगदी सहजभावना आहे आणि सर्वात सुंदरदेखील. अर्थात यामध्ये नक्कीच कोणी वाद घालणार नाही. तुमचं ज्याच्यावर प्रेम आहे त्या माणसाला जेव्हा किस करता तेव्हा तुमच्या हृदयाची धडधड साहजिकच वाढलेली असते. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, लंडनमधील एका तरुणाने गर्लफ्रेंडने किस केल्यानंतर थेट कोर्टाचा दरवाजा ठोठावत आपल्या गर्लफ्रेंडवर लाखो रुपयांचा दावा ठोकला आहे.

मार्टिन एशले कॉन्वे असं या तरुणाचं नाव असून, त्यांची गर्लफ्रेंड जोवाना लवलेश हिने त्याला किस केलं, त्यानंतर तो आजारी पडला असं त्याच म्हणणं आहे. म्हणून त्याने आता तिच्याकडून भरपाई मागितली आहे. कॉन्वे आणि जोवाना यांची मे २०१९ मध्ये सोशल मीडियावरती मैत्री झाली होती. नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ४ जुलै २०१९ ला जोवानाने कॉन्वेला भेटायला बोलावलं. यानंतर दोघंही सेंट्रल लंडनमध्ये भेटले आणि तिथं त्या दोघांनी एकमेकांना किस केलं आणि परत तो आजारी पडला.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, कॉन्वेने म्हटलं की, त्याला झालेल्या इन्फेक्शनची लक्षण फ्लू सारखी आहेत आणि त्याच्या तोंडात अल्सरही आलेत. त्याला इतका ताप आला की रुग्णालयात भरती व्हावं लागलं. जोवानामुळे आपण आजारी पडल्याचं त्याचं म्हणणं आहे. जोवानाला सर्दी-ताप होता हे त्याला माहिती नव्हतं. जेव्हा तिचा मेकअप थोडा उतरू लागला तेव्हा त्याला याबाबत माहिती झाली. तसेच यामुळे इतका आजारी पडेल याचा मला अंदाज नसल्याचं त्यांन म्हटलं.

कॉन्वेच्या मते, जोवानाने त्याला आपल्याला गंभीर कोल्ड असल्याचं सांगितलं नाही. ज्याचा दुष्परिणाम आता आपल्याला भोगावा लागत आहे. जेव्हा आपण आजारी असू तेव्हा दुसऱ्या व्यक्तीला त्याबद्दल आधी माहिती द्यावी, जेणेकरून ती सावध राहते हा सामान्य नियम आहे. घडलेल्या प्रकरणानंतर त्याने जोवानासोबत ब्रेकअप केलं. तसेच तिच्याकडून भरपाईदेखील मागितली आहे. त्याने तिच्याकडून १३६,३२८ पाउंड म्हणजेच जवळपास एक कोटींपेक्षा जास्त पैशाची भरपाई म्हणून मागणी केली आहे.