Manasi Naik | अभिनेत्री मानसी नाईक किसिंग सीन, चंद्रमुखी चित्रपट आणि सध्या काम मिळत नसल्यावर बोलली स्पष्ट…!

पोलीसनामा ऑनलाइन – मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) ही तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. मानसी गेली अनेक वर्षे मराठी चित्रपटांमध्ये व अल्बममध्ये झळकत आहे. तरी सध्या ती चित्रपटांमध्ये काम करताना दिसत नाही. अभिनेत्री मानसी नाईक हिने नुकत्याच भार्गवी चिरमुलेच्या (Bhargavi Chirmule) चॅट शो मध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी मानसीने दिलखुलास गप्पा मारल्या असून अनेक विषयांवर मनमोकळी उत्तरं दिली आहेत. मानसी नाईकने (Manasi Naik) तिने चित्रपटात दिलेले किसिंग सीन तसेच चंद्रमुखी चित्रपटावर तिने केलेली कमेंट यासारख्या विषयांवर उत्तरं दिली आहेत.

अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने मानसीला तिच्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केले होते. अनेक विषयांवर या दोन्ही अभिनेत्री बोलताना दिसल्या. भार्गवीने मानसीला पहिल्या चित्रपटामधील किसिंग सीनबाबत (Manasi Naik Kissing Scene) प्रश्न विचारला यावर उत्तर देत मानसी म्हणाली की, “मी त्या चित्रपटात एक नाही तर दोन किसिंग सीन दिले आहेत.” अभिनेत्री मानसी नाईक ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या रिल्स या सोशल मीडियावर शेअर करते. अनेकांनी तिला रिल्स का काढते असा प्रश्न करण्यात येत असतो. याबद्दल देखील मानसीने मुलाखतीमध्ये सांगितले आहे. अभिनेत्री मानसी रिल्स काढण्यावरुन म्हणाली की, “मला एक खूप मोठा दिग्दर्शक म्हणाला होता की, तू अजून रिल्स का करतेस? लोकांना प्रश्न पडतो की, एवढी मोठी कलाकार असूनही का रिल्स करते? मी त्या दिग्दर्शकाला सांगितलं होतं की, मी मोठी कलाकार नाही, मला मोठं व्हायचंय. दुसरी गोष्ट मला चित्रपट मिळत नाहीये म्हणून मी रिल्स करतीये.”

मराठी मनोरंजन विश्वामध्ये अभिनेत्री मानसी नाईक हिने तिच्या अभिनयाच्या व नृत्य कौशल्याच्या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मराठी प्रेक्षक वर्गाला मानसी नाईक हे नाव परिचित आहे. असे असले तरी तिला आत्ता काम मिळत नसल्याचे दिसते आहे. चित्रपट मिळत नसल्याची खंत मानसीने बोलावून दाखवली आहे. मानसी काम न मिळण्यावरुन म्हणाली की, “चित्रपट न मिळण्याची खंत ही कोणत्याही कलाकाराला असते, मलाही आहे. मी कोणत्याच कामाला नाही म्हणत नाही. मला कष्ट करायला आवडतात.”

मध्यंतरी ‘चंद्रमुखी’ चित्रपटावर कमेंट केल्यामुळे मानसी नाईक (Manasi Naik Comment On Chandramukhi Movie) चर्चेत आली होती. भार्गवीने तिला यावरुन प्रश्न केला. तेव्हा अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) म्हणाली की, “’एकदा मी, विश्वास सर, सुबोध सर आम्ही तिघे चंद्रमुखी चित्रपटाबाबत बोलत होतो. त्यावेळी सुबोध भावे (Subodh Bhave) हे हा चित्रपट दिग्दर्शित करणार होते. तेव्हा ते म्हणाले, ‘चंद्रमुखी तू’ . ही घटना मी कोणाचही नाव न घेता एका मुलाखतीमध्ये सांगितली. मला प्रसाद ओक यांनी चंद्रमुखीसाठी कधीच अप्रोच केलं नव्हतं. मला जेव्हा चंद्रमुखी चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं होतं, तेव्हा दिग्दर्शक, निर्माते सगळेच वेगळे होते. मात्र तेव्हा घडलेल्या या गोष्टीवरुन माझी खिल्ली उडवण्यात आली होती. एका अभिनेत्रीने मला फोन केला होता, मला विचारायला की, ‘तू असं का बोललीस?’ तेव्हा ती अभिनेत्रीनं मला खूप बोलली होती.” असे मानसीने सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cough Problem | सर्दीत औषध घेणे किती योग्य किंवा किती दिवसानंतर उपचार करावा सुरू?

Prostate Cancer च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात 43 टक्के पुरुष, तुम्ही करू नका ‘ही’ चूक

Constipation | मॅग्नेशियम बद्धकोष्ठता दूर करण्यात परिणामकारक उपाय आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण,
लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी