Manasi Naik | प्रदिप खरेराच्या इंन्स्टा रीलवर भडकली मानसी नाईक; म्हणाली….

पोलीसनामा ऑनलाईन | मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द सिनेतारका मानसी नाईक (Manasi Naik) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या घटस्फोटाबाबतचे वृत्त सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर स्वतः अभिनेत्री मानसी नाईकने (Manasi Naik) या वृत्ताला दुजोरा दिला होता. त्यातच आता मानसी नाईक तिचा पती प्रदिप खरेरा याच्यावर चांगलीच संतापली आहे.

मानसीने (Manasi Naik) आपल्या घटस्फोटाबाबत भाष्य करताना सांगितले होते की, प्रदिपने तिच्याशी लग्न हे केवळ पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी केले होते. तसेच प्रदिपसोबत लग्न करण्याचा तिचा निर्णय पूर्णपणे चुकल्याचेही ती म्हणाली होती. तसेच स्वामी आपल्या पाठीशी असून ते नक्की तिला या संकटातून बाहेर काढतील असा विश्वास तिने व्यक्त केला आहे. तसेच या धक्क्यातून सावरत तिने आता आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातच प्रदिपने इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केला आहे. त्यात तो रडताना दिसत आहे. मात्र आता प्रदिपच्या या व्हिडीओवर मानसीने एक पोस्ट शेअर केली आहे.

घटस्फोटाच्या चर्चेनंतर प्रदिप मित्रांसोबत पार्टी एन्जॉय करताना दिसला. मिडीयाशी मनमोकळेपणाने न बोलता त्याने इन्स्टाग्रामवर रिल शेअर करत आपण किती दुःखी आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या रिलमध्ये तो रडताना दिसतो. त्यावरून मानसीपासून विभक्त झाल्यानंतर प्रदिप पूर्णपणे खचला आहे असे तो भासवतो आहे तसेच त्याच्याशी मानसी किती चुकीची वागली हे तो या रिलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याच्या या रिलमधून त्याचा ढोंगीपणा उघडा होत आहे, असे मानसी (Manasi Naik) म्हणाली.

काही दिवसांपूर्वी प्रदिपने एका सोशल मिडीयावर स्टार बनलेल्या मुलीसोबत एक रिल बनवले होते.
त्याचे हे रिल पाहून मानसीने (Manasi Naik) एक पोस्ट शेअर केली होती.
त्यात ती म्हणाली आहे की, अरे कच्ची कलियाँ मिल गई एक नहीं बल की दो दो…और रोने की एक्टिंग के ५०
रूपए काटे जाए..बंदा पार्टी करता है और रिल मे रोता है.. फेक लव्ह, सहानुभूती, मै ही देती फोकट में,
जैसे खाया यूज किया फोकट में…Karma will talk असे लिहीत मानसीने प्रदिपचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Web Title :- Manasi Naik | used me and mansi naik furious over husband pradeep khareras crying that reel

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus | जगात कोरोनाचा वाढता कहर, भारतात पुन्हा मास्क सक्ती? केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या…

Devendra Fadnavis | पोर्नोग्राफिक विकृतीला ठेचण्यासाठी राज्यात सायबर प्रकल्प उभारणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Ambadas Danve | मेंढपाळांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई करावी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी

Health Alert | रात्री होत असेल झोपमोड तर व्हा सतर्क! धोक्यात आहे तुमच्या शरीराचा ‘हा’ अवयव

Gauahar Khan | अभिनेत्री गौहर खानची चाहत्यांना गुडन्यूज; लवकरच होणार….