तहसीलदार असल्याचे सांगून मंडळ अधिकाऱ्याने घातला सव्वा लाखाचा गंडा

वसई : पोलीसनामा ऑनलाईन – पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असताना आपण तहसीलदार असल्याची बतावणी करून मुंबईच्या जमीन देण्याच्या बहाण्याने तलासरी येथील झरी मंडळ अधिकाऱ्याने व्यावसायिकांना तब्बल १ कोटी २० लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकऱणी त्याच्यावर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील  पोपट राठोड (४२) असे मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील राठोड हा झरी मंडळ अधिकारी आहे. तो पुरवठा निरीक्षक २०१३ मध्ये अभिषेक रामसिंग हांडा व त्यांचे भागीदार इम्रान पटेल या दोघा व्यावसायिकांना आपण तहसीलदार आहोत असे सांगत वसईत जमीन देतो असे अमिष दाखवले. त्याने त्यांच्याकडून १ कोटी २० लाख रुपये उकळले. त्यानंतर इम्रान पटेल यांचा २०१५ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर हांडे यांनी राठोडकडे पैशांची मागणी केली. त्यासाठी सतत पाठपुरावा केला. त्यानंतर त्याची तलासरी तालुक्यातील झऱी मंडळ अधिकारी म्हणून बदली झाली.

तेथे असतानाही त्याच्याकडे तगादा लावलाय मात्र त्याने पैसे परत दिले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.