मॅनेजरनेच फोडले कुरिअरचे ऑफिस : दोघांना केली अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – कुरियर कंपनीचे ऑफिस फोडणाऱ्या पारनेर पोलिसांनी अटक केली आहे. आज ही कारवाई करण्यात आली. मॅनेजर किरण भास्कर कदम व प्रशांत शिंदे ही अटक केलेल्यांची नावे आहेत.

पारनेर पोलिस स्टेशन किरण भास्कर कदम (वय ३० वर्षे, धंदा- खाजगी नोकरी ई कॉम एक्सप्रेस सुपरवायझर, रा. लोणी रोड, पारनेर ता. पारनेर, जि. अहमदनगर) याने दि.०९ रोजी सायंकाळी ७ वाजता ते दि. १० रोजी सकाळी साडेसात दरम्यान ईकॉम एक्सप्रेस प्रा. लि. (कुरिअर सन्हिस ) पारनेर येथे कोणीतरी अज्ञात चोरट्याने ईकॉम एक्सप्रेस प्रा. लि. (कुरिअर सव्हिस) चे बंद ऑफिसचे शटर उचकटून आत प्रवेश करुन वरील नमूद रोख रक्कम व वरील नमुद नंबरच्या व किंमतीच्या ग्राहकांच्या वस्तू फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने स्वत:चे आर्थिक फायद्याकरिता चोरुन नेले आहे.

ही चोरी फिर्यादी ईकॉमचे पारनेर येथील मॅनेजर किरण भास्कर कदम व प्रशांत शिंदे यांनीचे
केलेचे तपासात निष्पन्न झाले. त्यांचेकडून विविध कंपनीचे पाच मोबाईल अंदाजे ७५ हजार रुपयांचे
मोबाईल, एक लेडीज ड्रेस, इलेक्ट्रिक शेगडी ५ हजार रुपये व ४७ हजार ५०० रुपयांची कॅश असा संपूर्ण एकूण १ हजार २७ हजार ५०० रुपयांचा किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार, पोसई बोत्रे, पोसई पद्मणे, पोलीस कर्मचारी विनोद बोरगे, शिवाजी कावडे, महेश आव्हाड यांच्या तपास पथकाने ही कारवाई केली.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

#Video : ‘या’ फॉरेनरचा बॉलिवूड गाण्यावरील ‘बोल्ड डान्स’ होतोय प्रचंड व्हायरल

#Video : रिअल लाफफमध्ये खूपच ‘हॉट’ आहे ‘खिलाडी’ अक्षयची ‘ही’ अभिनेत्री, पहा फोटोज, व्हिडीओज