Mangal Dhillon Death News | दिग्गज अभिनेते मंगल ढिल्लन यांचे निधन

लुधियाना : Mangal Dhillon Death News | चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेले अभिनेते मंगल ढिल्लन (Mangal Dhillon Death News) यांची कॅन्सरशी झुंझ अखेर अयशस्वी ठरली आहे. काही दिवसांपासून ते लुधियानाच्या रुग्णालयात (Ludhiana Hospital) कर्करोगावर (Cancer) उपचार घेत होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान रविवारी त्यांचे निधन झाले. अभिनेता यशपाल शर्माने सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

मंगल ढिल्लन (Mangal Dhillon Death News) हे पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत (Punjabi Film Industry) प्रसिद्ध होते. त्यांनी बऱ्याच पंजाबी चित्रपटांमध्ये (Punjabi Movies) भूमिका साकारल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले आहे. ते मूळचे पंजाबमधील फरीदकोट येथील होते. त्यांचा जन्म पंजाबमधील फरीदकोट जिल्ह्यातील वांडर जटाना गावातील एका शीख कुटुंबात झाला. चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते वडिलांसोबत उत्तरप्रदेशला गेले. तिथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुन्हा पंजाबला परतले. पदवीनंतर मंगल यांनी दिल्लीत थिएटरमध्ये काम केले आहे.

 

ढिल्लन यांना पहिला ब्रेक 1986 साली मिळाला. त्यांनी कथा सागर या टीव्ही मालिकेत काम केले.
पण त्याच वर्षी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘बुनियाद’ या मालिकेमुळे त्याला लोकप्रियता मिळाली.
त्यानंतर त्यांनी किस्मत, द ग्रेट मराठा, मुजरिम हाजिर, नूरजहाँ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले.
टीव्ही इंडस्ट्रीत काम करत असतानाच त्यांना चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या.
1988 साली त्यांनी ‘खून भरी मांग’ या चित्रपटातून पदार्पण केले. यात ते वकिलाच्या भूमिकेत दिसले होते.

 

Web Title :  Mangal Dhillon Death News | actor director producer mangal dhillon passes away due to cancer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा