Mangalprabhat Lodha | ‘मी नवीन प्लेयर, ओपनिंगला उभं केलं अन् तुम्ही सगळे बाउन्सर वर बाउन्सर टाकताय‘ – भाजपाचे नवे मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mangalprabhat Lodha | सभापती महोदया, एक तर मी नवीन प्लेयर आहे, त्यात मला ओपनिंगला उभं केलं आणि माझ्यावर बाऊन्सर वर बाऊन्सर टाकले जात आहेत. आता तरी थांबा कारण त्या प्रश्नाचा याच्याशी काहीही संबंध नाही, असे उत्तर भाजपाचे नवे मंत्री (BJP Minister) मंगलप्रभात लोढा यांनी देताच सभागृहात एकच हशा पिकला. लोढा म्हणाले, तुमच्या सर्व प्रश्नांवर मी सविस्तर उत्तर देईन. (Mangalprabhat Lodha)

शासनाकडे नोंदणी केलेल्या बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासंबंधी माझा प्रश्न आहे. जनगणनेचे काम अनेकदा शिक्षकांवर अतिरिक्त बोजा म्हणून लादले जाते. त्याऐवजी या कामासाठी या बेरोजगारांना शासन समाविष्ट करून घेणार का? या संदर्भात एखाद्या पॉलिसीचा शासन विचार करणार आहे का? असा प्रश्न भाजपाचे निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांनी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विचारला होता. (Mangalprabhat Lodha)

 

तसेच प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंगलप्रभात लोढा यांनी दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या खाजगी आस्थापनांनी कौशल्य विभागाच्या पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. यानंतर लोढा यांनी मिष्कील भाषेत वरील उत्तर दिल्याने सभागृहात हशा पिकला.

 

Web Title :- Mangalprabhat Lodha | Maharashtra bjp minister mangal prabhat lodha reacting to questions raised in assembly in comedy way

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Navneet Rana | नवनीत राणांच्या खासदारकीमागे नेमके कुणाचे आशीर्वाद? शरद पवार की भाजपा नेते देवेंद्र फडणवीस?

 

CM Eknath Shinde | नगराध्यक्ष, सरपंच निवड थेट जनतेतून ही जनतेचीच मागणी, आमचा अजेंडा नाही; मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

 

Mohit Kamboj-Rohit Pawar | ट्विट करत मोहित कंबोज म्हणाले – ‘बारामती अ‍ॅग्रो कंपनीचा…’