Mango Harmful Effects | आंबा खाल्ल्यानंतर ‘या’ गोष्टींच सेवन नका करू, नाहीतर…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Mango Harmful Effects | उन्हाळा ऋतु म्हटलं की, कडाक्याचं ऊन डोळ्यासमोर येतं. या व्यतिरीक्त आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येतो, तो दुसरा तिसरा कोणी नसून फळांचा राजा आंबा (Mango). आंबा हे असं फळ आहे की, ते उन्हाळ्याच्या दिवसांमध्येच येतं. आंबा सगळ्यांनाच खायला आवडतो. परंतू काहीजण आंबा खाल्ल्यानंतर लगेचंच दुसरे पदार्थ खातात. (Mango Harmful Effects) तर आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत, ज्यांचे सेवन आंबा खाल्ल्यानंतर करू नये.
1. थंड पेय (Cold Drink) :
काही खाल्ल्यानंतर लोकांना अनेकदा तहान लागते. विशेषतः गोड खाल्ल्यानंतर. पण अनेकांना कोल्ड ड्रिंक्स प्यायला आवडते. परंतू कोल्ड ड्रिंक्समध्ये असलेला सोडा आणि साखर (Soda And Sugar) दोन्ही शरीरासाठी हानिकारक असतात. आंब्यामध्येही नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण जास्त असते आणि त्यानंतर कोल्ड्रिंक प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Lecel) वाढण्याचा धोका असतो. (Mango Harmful Effects)
2. दही (Curd) :
आंबा खाल्ल्यानंतर लगेच दही खाणे देखील योग्य नाही. कारण आंबा आणि दही मिळून कार्बन डायऑक्साइड (Carbon Dioxide) तयार होते. ज्यामुळे तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शकतो.
3. पाणी (Water) :
आंबा खाल्ल्यानंतर तहान नक्कीच लागते, पण काही वेळ थांबून पाणी प्यायला हवे. आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास ते पचण्यास त्रास होतो. त्यामुळे गॅस, छातीत जळजळ (Gas, Heartburn) यासारख्या समस्या होऊ शकतात.
4. मसालेदार अन्न (Spicy Food) :
उन्हाळ्यात अन्न खाल्ल्यानंतर लोकांना आंबा खायला आवडतो. मात्र, ही सवय योग्य नाही.
मसालेदार आणि मसालेदार जेवणानंतर आंबा खाल्ल्याने पोटदुखी किंवा छातीत जळजळ होऊ शकते.
यासोबतच मुरुमांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.
5. कारले (Bitter Melon) :
जेवताना जर तुमच्या ताटात कारले आणि आंबा दोन्ही असतील तर थोडा वेळ थांबा.
कारण कारले आणि आंबा एकत्र खाल्ल्यानेपोटाचा त्रास होऊ शकतो.
आंबा खाल्ल्यानंतर लगेच कारले खाल्ल्याने उलट्या (Vomiting), मळमळ (Nausea) आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Mango Harmful Effects | never eat these 5 things immediately after eating mangoes
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sugar Content In Sugarcane Juice | गोड ऊसाच्या रसामध्ये किती प्रमाणात साखर असते?; जाणून घ्या सविस्तर