‘या’ सोप्या ‘फेशियल’ने येईल चेहऱ्यावर त्वरीत चमक

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आपण शरीर निरोगी राहण्यासाठी आणि फिट दिसण्यासाठी अनेक व्यायाम करतो. तसंच आपला चेहरा नेहमी ताजातवाना दिसण्यासाठी आणि चेहरा व्यवस्थित आकारात राहण्यासाठी आपल्याला फेशियल व्यायामाचीही आवश्यकता असते. बरेचदा हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे सर्वात पहिला परिणाम होतो तो चेहऱ्यावर. त्यामुळे तुम्ही या फेशियल व्यायामाची स्वतःला सवय लावून घ्या.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढायची गरज नाही. तुम्ही काम करत असातानाही हा व्यायाम सहज करू शकता. हा व्यायाम तुमच्या चेहऱ्याच्या मसल्ससाठी उत्तम आहे. तसंच तुमच्या डोळ्यांना सतत कार्यरत ठेवतो. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक तर येतेच शिवाय चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठीही फायदेशीर ठरतो.

फेशियल व्यायाम हा अनेक पद्धतीचा असतो आणि त्याचे फायदेही वेगवेगळे असतात. पण अनेक महिलांना जाणून घ्यायचे असते की, आपला चेहरा अधिक बारीक, सुरकुत्यामुक्त आणि चमकदार कसा दिसू शकेल. बऱ्याचदा यासाठी मेकअपची मदत घेतली जाते. पण त्यापेक्षा तुम्ही नियमित जर फेशियल व्यायाम केलात तर तुमची त्वचा अधिक चांगली आणि सुंदर दिसते.

त्यासाठीच आम्ही या लेखातून तुमच्यासाठी काही खास फेशियल एक्सरसाईज अर्थात व्यायाम देत आहोत. सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवालाने तिच्या सोशल अकाऊंटवर या व्यायामाबद्दल माहिती दिली आहे. हे व्यायाम तुम्ही नियमित केल्यास, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा मिळेल आणि चेहऱ्यावर चमक तर येईलच त्याशिवाय चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होण्यासही मदत होईल.

कसा करावा व्यायाम

– सर्वात पहिले आपल्या दोन्ही हाताची तर्जनी डोळ्यांखाली आणि नाकाजवळ ठेवा
– त्यानंतर तुमचे अप्पर लिप्स दातांनी कव्हर करा आणि ते आतल्या बाजूला मोडा
– आता तोंड मोठं करा आणि खालील ओठाच्या आता मोडून घ्या
– त्यानंतर डोळे वरच्या बाजूला करा आणि सारखे सारखे डोळ्यांची उघडझाप करा
– हा एक उत्तम व्यायाम आहे. हा व्यायाम नियमित स्वरूपात तुम्ही ५-५ च्या सेटमध्ये दोन वेळा करू शकता

चेहऱ्याचे ब्लड सर्क्युलेशन चांगले करण्यासाठी तुम्हाला हा फेशियल व्यायाम नक्की करायला हवा. तुमच्या चेहऱ्याचे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहिले तर चेहऱ्यावर अधिक ताजेपणा जाणवतो आणि त्वचाही तरूण राहते.

कसा करावा व्यायाम

– सर्वात पहिले आपल्या हाताची तर्जनी भुवयांच्या मध्ये ठेवा
– आता या बोटाने कपाळावर ताण द्या. अर्थात कपाळावर प्रेशर द्या
– असे कमीत कमी पाच वेळा नक्की करा
– तुम्हाला हवं तर हा व्यायाम तुम्ही दिवसातून दोन वेळा करू शकता

तुमची त्वचा अधिक चांगली उजळावी आणि त्याचे टेक्स्चर चांगले राहावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा फेशियल व्यायाम नक्की करायला हवा.

कसा करावा व्यायाम

– सर्वात पहिले आपले हात सरळ करून तर्जनी भुवयांच्या मध्ये ठेवा
– त्यानंतर क्लॉकवाईज आणि अँटिक्लॉकवाईज हे बोट फिरवा
– थोडा आराम करा आणि मग पुन्हा असंच करा
– असे कमीत कमी पाच वेळा करा
– हा व्यायाम केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील रक्तप्रवाहदेखील चांगला राहतो