‘तुझं मुंडक छाटून टाकीन’, मुख्यमंत्र्यांनी हातात कुर्‍हाड घेऊन दिली भाजप नेत्याला धमकी (व्हिडीओ)

चंदिगड : वृत्तसंस्था – हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हातात कुऱ्हाड घेतलेले खट्टर आपल्या पक्षातील नेत्याला मान कापण्याची धमकी देताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे ते वादात सापडण्याची शक्यता आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ खट्टर यांच्या जनआशीर्वाद यात्रेतील आहे. या व्हिडीओत खट्टर एका वाहनावर उभे राहिलेले दिसत आहेत. त्यांच्या हातात एक कुऱ्हाड आहे. कुऱ्हाड शत्रूचा नाश करण्यासाठी असते, असं म्हणत खट्टर उपस्थितांशी संवाद साधत आहेत. याचवेळी खट्टर यांच्या मागे असलेल्या एका भाजपा नेत्यानं खट्टर यांना टोपी घालण्याचा प्रयत्न करतो. मात्र खट्टर यांना ही गोष्ट न आवडल्यानं ते संतापतात आणि त्या नेत्याला म्हणतात की हे काय करतो ? बाजूला हो नाहीतर मान कापून टाकेन तुझी. यानंतर तो भाजपा नेता खट्टर यांची हात जोडून माफी मागताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांनी शेयर केला आहे.

हा व्हायरल व्हिडिओ काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनीही शेयर केला आहे. सुरजेवाला यांनी व्हिडिओ शेयर करताना म्हटले आहे की , ‘राग आणि अहंकार आरोग्यासाठी हानीकारक असतो. खट्टर साहेबांना राग का येतो? कुऱ्हाड घेऊन त्यांच्याच नेत्याला म्हणतात, मान कापून टाकेन. मग जनतेसोबत काय करतील?’

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे सार्वजनिक ठिकाणी चिडण्याची पहिलीच वेळ नाही. नुकताच करनालमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात खट्टर जनतेवर फुलांचा वर्षाव करत होते. या वेळी त्यांच्याजवळ उभे असलेल्या युवकाने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला असता खट्टर यांनी त्याला ढकलले होते.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like