गोवा पोट निवडणूक : मनोहर पर्रिकरांच्या जागेवरून ‘हे’ लढणार निवडणूक

पणजी : वृत्तसंस्था – गोव्याचे दविंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मोठा मुलगा उत्पल पर्रिकर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर त्यांचा मोठा मुलगा उत्पल पर्रिकर यांना मनोहर पर्रिकरांच्या जागेवरुन उभे करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच जनसामान्यांमध्येही उत्पल पर्रिकर याना उमेदवारी द्यावी अशी चर्चा सुरु आहे.  १९ मे रोजी सातव्या टप्प्यात पणजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे.

असे सांगण्यात येत आहे कि, भाजपचे अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी पणजी ब्लॉक समितीबरोबर वेगवेगळ्या पार्टीच्या संभाव्य नावांवर चर्चा केली. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दोन नावे निवडली. ते म्हणजे एक उत्पल पर्रिकर आणि दुसरे सिद्धार्थ कुनकोलिनकर. अंतिम निर्णयासाठी ही नावे दिल्ली येथे पक्षाचा संसदीय मंडळाकडे पाठवले जातील असे तेंडुलकर म्हणाले.

३८ वर्षीय उत्पल पर्रिकर यांनी अमेरिकेतून पदवी प्राप्त केली आहे. ते आता एका व्यवसायाशी संलग्न आहेत. पणजी विधान सभा मतदार संघातील दावेदार कुंकोलिनकर यांनी २०१७ विधानसभा निवडणुक जिंकली.

पणजी विधानसभा मतदार संघातून भाजपची थेट काँग्रेससोबत लढत आहे. काँग्रेसने माजी राज्य मंत्री अटानासियो मोनसेराटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.