Manoj Jarange Daughter Pallavi | मनोज जरांगेंची लेक बुलढाण्यातील मराठा मोर्चात, म्हणाली…मला वडिलांची आणि आरक्षणाची काळजी

बुलढाणा : Manoj Jarange Daughter Pallavi | मनोज जरांगे यांच्या अमरण उपोषणाने जालन्यातील अंतरवाली सराटी गाव मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation Protest) केंद्रबिंदू ठरले आहे. संपूर्ण राज्याचे याकडे लक्ष लागले आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा आज १५ वा दिवस आहे. दरम्यान, राज्यात ठिकठिकाणी आंदोलने अजूनही सुरूच आहेत. आज बुलढाण्यात काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चात मनोज जरांगे यांची मुलगी पल्लवी सहभागी झाली होती. (Manoj Jarange Daughter Pallavi )

बुलढाणा जिल्ह्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सकल मराठा समाजाने शांतीपूर्ण मोर्चाचे आयोजन केले होते. जालना येथे समाज बांधवांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा निषेध आणि समाजाला आरक्षण मिळण्याच्या समर्थनार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. (Manoj Jarange Daughter Pallavi)

यावेळी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना मराठा समाजाच्या वतीने पाच तरुणींनी निवेदन दिले. या मोर्चासाठी बुलढाण्यात आलेल्या मनोज जरांगे पाटील यांची कन्या पल्लवी पाटील हिने पत्रकारांशी बोलताना म्हटले की, मला माझ्या वडिलांची आणि आरक्षणाची काळजी आहे. आम्ही आमच्या हक्काची लढाई लढत आहोत. त्यामुळे सरकारने आम्हाला आरक्षण त्वरित द्यावे.

पल्लवी जरांगे म्हणाली, आम्ही मराठा असून पेटून उठलो आहोत, आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही.
सरकारला पण याची दखल घ्यावी लागेल. माझे वडील आरक्षण भेटल्याशिवाय उपोषण सोडणार नाहीत.
आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्या, मला माझा बाप हवाय, असे पल्लवीने म्हटले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Viral Video | ‘मुद्दामहून काही विरोधक लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करतायत’, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Amol Mitkari on Rohit Pawar | रोहित पवार व अमोल मिटकरी यांच्यामध्ये ट्विटर वॉर; मिटकरी म्हणाले,“तुम्ही लहान आणि नवखे…”