Manoj Jarange Patil | ”मराठा समाज ज्याला पाडायचंय त्याला नक्कीच पाडंल”, मनोज जरांगेंचं वक्तव्य, गृहमंत्र्यांवर केला गंभीर आरोप (Video)

पिंपरी – चिंचवड : मला बाजूला करण्यासाठी गृहमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) अनेक प्रयत्न केलेत. परंतु, मी बाजूला झालो नाही. सध्या महाराष्ट्रात खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. आमिश दाखवून माणसं फोडली जात आहेत. हे सर्व सरकारला जड जाईल, असा इशारा आज मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला. या लोकसभा निवडणुकीत मराठा समाज (Maratha Community) ज्याला पाडायचे आहे त्याला नक्कीच पाडेल, असेही ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीबाबत (Maharashtra Lok Sabha) मनोज जरांगे म्हणाले, उमेदवार होण्यापेक्षा पाडणारे बना, त्यात मोठा विजय आहे. मराठा समाजामध्ये शंभर टक्के रोष आहे. तो या निवडणुकीत नक्कीच दिसेल. आमचा मार्ग हा राजकीय नाही. आम्हाला आरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही कुठेही उमेदवार दिला नाही, किंवा कुठल्या पक्षाला पाठिंबा दिला नाही. ही निवडणूक मराठा समाज आपल्या हातात घेईल आणि ज्याला पाडायच आहे, त्याला नक्कीच पाडेल.

मनोज जरांगे पुढे म्हणाले, सहा जूनपर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास विधानसभा काबीज करू. तर वंचितबाबत बोलताना जरांगे म्हणाले, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासोबत आमचा संपर्क नाही. आमची मनं एक आहेत. दोन मन होऊ शकत नाही. कोणाला निवडून आणायचे हे समाज ठरवेल.

पण एक लक्षात ठेवा, आई-बहिणीच्या अंगावरील व्रण समाजाने विसरू नये. महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, यांनी मराठा समाजाला काही दिलेले नाही. जो सगेसोयऱ्यांचा निर्णय घेईल त्याच्या बाजूने रहा, असे आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा