Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, ”सरकारकडून माझ्यावर डाव, मोर्चात कुणाला तरी घुसवायचे आणि…”

मुंबई : Manoj Jarange Patil | मला शब्दात अडकवून गुंतवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. मराठा मोर्चात कुणाला तरी घुसवायचे आणि काहीतरी घडवायचे, असे नियोजन आखले जात आहे, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी केला आहे. आरक्षणासाठी मराठा समाज २० जानेवारीला मुंबईत धडकणार आहे. यासंबंधीत माहिती देताना जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी हा खळबळजनक आरोप केला. ते एका मराठी वृत्तवाहिनी बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले, ही माहिती मला सरकारी अधिकाऱ्यांकडूनच मिळाली. आम्ही आता सावध झालो आहोत. आमच्या स्वयंसेवकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. आंदोलनात कुणी हिंसाचाराचा प्रयत्न करतोय का? यावरही बारकाईने लक्ष ठेवले जाईल. (State Government)

(Manoj Jarange Patil) मनोज जरांगे म्हणाले, सरकारमधील मंत्र्यांची काल रात्री बैठक झाली अशी माहिती आहे. काही जणांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. मी या माहितीची खातरजमा करत आहे. लवकरच हे मंत्री कोण? याचीही नावे कळतील. मंत्र्यांच्या चर्चेत काहींनी आरक्षणाला विरोध केला, तर काहींनी मुंबईतील आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचा पर्याय दिला आहे.

मनोज जरांगे म्हणाले, सरकारकडून माझ्यावर डाव टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी मराठा समाज आंदोलनातून राजकीय दुकानदारी सुरू केलेल्यांना पुढे करून माझा विरोध करण्याचा प्रयत्न आहे. त्यांना पत्रकार परिषदा घेण्याचे आणि वृत्तवाहिनीवरील चर्चांमध्ये सहभागी करून विरोधात बोलण्याच्या सूचना दिल्या आहेत. माझ्याविरोधात ट्रॅप रचण्याची तयारी केली जात आहे.

(Manoj Jarange Patil) मनोज जरांगे म्हणाले, मी मराठा समाजाच्या उन्नतीसाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागतोय. माझ्या मागणीला ६ कोटी मराठा समाजाने पाठिंबा दिलाय. पण सरकारने पाच-पन्नास मराठा नेत्यांना हाताशी धरून षडयंत्र रचण्याचा डाव रचला आहे. माझ्यामुळे अनेकांची दुकानदारी बंद झाली. हे यांचे सर्वात मोठे दुखणे आहे.

मनोज जरांगे म्हणाले, समाजाच्या नावावर नेतेगिरी करणारे पूर्णपणे भूईला टेकलेत.
सरकार अशा लोकांना पाठपळ देत आहे. मराठा समाजाला आवाहन करतो की, मला संकटकाळात साथ द्या.
सरकारने मला गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही.

मनोज जरांगे म्हणाले, मला अशीही माहिती मिळाली की, गुजरातमधून फोर्स मागविण्यात आला आहे.
तो सुरक्षा व्यवस्थेसाठीही मागितला असेल. मी उगाच बिनबुडाचे आरोप करणार नाही.
बीड किंवा संभाजीनगरमध्ये फोर्स आलेला आहे, अशी माहिती सरकारमधील सूत्रांनीच दिली.
मला अधिकृत माहिती मिळालेली नाही. मी शहानिशा करून याबद्दलचे सत्य समोर ठेवेन.

जरांगे यांनी सरकारला आव्हान देताना म्हटले की, सरकारने कितीही षडयंत्र केले तरी मी मागे हटणार नाही.
सरकारला आमची कत्तल करावी लागेल. मराठा समाजाच्या आंदोलनाचे इतके दडपण सरकारने का घेतले आहे?
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जितक्या बैठका घेतल्या, त्यापेक्षा अधिक बैठका आंदोलन चिरडण्यासाठी केल्या
जात आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

न्याती कंपनीच्या ध्यान मंदिराच्या घुमटावरुन पडून कामगाराचा मृत्यू, कॉन्ट्रॅक्टरवर FIR

पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणाला अटक

Pune Accident News | भरधाव बसची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू तर दोन पादचारी जखमी; कात्रज परिसरातील घटना

अमावस्या, पोर्णिमेला देवाला अंडी, सिगारेट, दारुचा नैवैद्य; मुलासाठी सुनेचा छळ, जादुटोणा कायद्याखाली पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

‘तू दादा झालास का’ म्हणत बिअरच्या बाटल्यांनी मारहाण, एकाला अटक; कर्वेनगर येथील घटना

इंन्स्टाग्रामवर ओळख करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, डेक्कन परिसरातील घटना

Pune Police Inspector Transfer | पुणे शहरातील 23 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे शहर वंचित बहुजन आघाडी कार्यकारी अध्यक्षावर स्टेशन परीसरात हल्ला

कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्या, वाकड परिसरातील घटना

आर्थिक वादातून तरुणाचा कोयता, कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण खून, दोन आरोपी ताब्यात; चाकण येथील घटना

Navigating the Spiritual Journey: Online Booking for Ram Mandir Aarti Passes Unveiled

कारचे पैसे परस्पर घेऊन सेल्स कन्सलटंटने लावला चुना