Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर (Gas Cylinder) मधून धोकादायकपणे चोरून गॅस काढून त्याची चढ्या भावाने काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.15) विठ्ठलनगर येथील बिरादार यांच्या दुकानात रात्री सव्वा नऊच्या सुमारास केली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पोलीस शिपाई विजय हरीदास जानराव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजेसाब मस्तानसाब मजकुरी (वय-20 रा. पाचपीर चौक, काळेवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी 285, 286 सह जिवनावश्यक वस्तुंचा कायदा 1955 चे कलम 3,7 सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन 1908 चे कलम 5 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी विठ्ठलनगर येथील बिरादार यांच्या दुकानात छापा टाकला. त्यावेळी आरोपी घरगुती वापराच्या भरलेल्या गॅस सिलेंडर मधून रिफीलिंग सर्कीटच्या सहाय्याने गॅस अवैधरित्या दुसऱ्या सिलेंडर मध्ये भरताना आढळून आला.

आरोपी हा बेकायदेशीर रित्या कोणत्याही परवानगी शिवाय व कोणत्याही सुरक्षितते शिवाय भरलेल्या सिलेंडर मधील
गॅस रिकाम्या गॅस टाकीमध्ये भरत होता. यावेळी जिवीतास धोका होण्याची शक्यता असताना देखील आरोपी हा
बेकायदेशीर कृत्य करत असताना आढळून आला. त्याच्याकडून 24 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात
आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | भरधाव बसची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू तर दोन पादचारी जखमी; कात्रज परिसरातील घटना

अमावस्या, पोर्णिमेला देवाला अंडी, सिगारेट, दारुचा नैवैद्य; मुलासाठी सुनेचा छळ, जादुटोणा कायद्याखाली पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

‘तू दादा झालास का’ म्हणत बिअरच्या बाटल्यांनी मारहाण, एकाला अटक; कर्वेनगर येथील घटना

इंन्स्टाग्रामवर ओळख करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, डेक्कन परिसरातील घटना

Pune Police Inspector Transfer | पुणे शहरातील 23 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे शहर वंचित बहुजन आघाडी कार्यकारी अध्यक्षावर स्टेशन परीसरात हल्ला

कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्या, वाकड परिसरातील घटना

आर्थिक वादातून तरुणाचा कोयता, कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण खून, दोन आरोपी ताब्यात; चाकण येथील घटना

Navigating the Spiritual Journey: Online Booking for Ram Mandir Aarti Passes Unveiled

कारचे पैसे परस्पर घेऊन सेल्स कन्सलटंटने लावला चुना