Sushma Andhare Letter In Sanskrit | ‘तुरूंगवास पत्करेन पण माफी नाही”, सुषमा अंधारेंचे दिलगिरीऐवजी उपसभापती गोऱ्हेंना संस्कृतमध्ये खरमरीत पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sushma Andhare Letter In Sanskrit | विधान परिषदेत आलेल्या हक्कभंग प्रस्तावावर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंना दिलगिरी पत्र द्या अन्यथा हक्कभंगाला सामोरे जा असे म्हटले होते. परंतु, सुषमा अंधारे यांनी दिलगिरी व्यक्त करण्यास स्पष्ट नकार देत, संस्कृत भाषेत उपसभापतींना एक खरमरीत पत्र लिहिले आहे. या पत्रात भाजपाचे शेलक्या शब्दात वाभाडे काढले आहेत. आता निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यावर कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Sushma Andhare Letter In Sanskrit)

उपसभापतींनी दिलगिरीसाठी सुषमा अंधारे यांना ८ दिवसांची मुदत दिली आहे. विशेष म्हणजे अंधारे यांनी हे पत्र समाज माध्यमांवर प्रसिद्ध केले असून, सोबत मराठी अनुवाद देखील लोकांसाठी दिला आहे. (Sushma Andhare Letter In Sanskrit)

सुषमा अंधारे यांनी विधान परिषद उपसभापतींना संस्कृतमध्ये लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी माफी अजिबात मागणार नाही. प्रिय लोकशाही तुझ्याबद्दल मनात कायम आदेर आहे. तुझे अस्तित्व टिकावं म्हणूनच ही अविरत लढाई आहे.स्वातंत्र्यासाठी ज्या अविरत आणि स्वातंत्र्यवीर, वीरांगणांनी प्राणांची आहुती दिली.

तितकीच कटीबद्धता स्वातंत्र्योत्तर काळातही संविधानात लोकशाहीची व्यवस्था टिकवण्यासाठी आता आमची आहे. त्याचाच भाग म्हणून संविधानाने निर्माण केलेल्या कुठल्याही घटनात्मक पदाबद्दल कमालीचा आदर बाळगणे हे माझे कर्तव्यदक्ष नागरीक म्हणून जबाबदारी आहे असं मी मानते.

त्याचसोबत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सभापती पद घटनात्मक असल्याने या पदाबद्दल माझ्या मनात आदर आहे. पण आज विधिमंडळाच्या सभापती पदावरील व्यक्तीने माझ्यावरील घटनात्मक पदाचा अवामन केल्याचा ठपका ठेवला आहे.

माझ्या ज्या कृतीला ते अपराध या व्याख्येत बसवू इच्छितात मुळात ती अत्यंत नकळतपणे अनाहूत झालेली चूक आहे. ज्या अनाहूतपणे सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विषय लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोगाकडे विचारणा करू म्हणाले किंवा देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपर्दी मुर्मू यांनी त्यांचा उल्लेख अनाहूतपणे पंतप्रधान म्हणून केला. अगदी तितक्यात अनाहुत नकळतपणे माझ्याकडून गोऱ्हे यांचे नाव आले.

ही चूक नक्कीच आहे पण दंडनीय अपराध नाही. पण तरीही माझ्या कृतीला अपराध ठरवण्याची अहमहमिका सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांकडून सुरू आहे.

प्रिय लोकशाही माझ्याकडून काही गुन्हा घडला असेल तर मी निश्चितपणे बिनशर्त माफी मागायला हवी. पण पक्षीय राजकारण म्हणून जे लोक महापुरुषांच्या अपमानावर चकार शब्द काढत नाहीत परंतु निव्वळ विरोधी पक्षाची व्यक्ती म्हणून राजकीय कुरघोडी करण्यासाठी मला झुकवण्याचा प्रयत्न करत असतील तर मात्र मी माफी अजिबात मागणार नाही. भलेही यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगावास पत्करेन, असे सुषमा अंधारे यांनी पत्रात म्हटले आहे.

काय आहे प्रकरण…

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असताना शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे
यांनी असा आरोप केला होता की, उपसभापती निलम गोऱ्हे या पुण्यातील काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर
यांना सभागृहात बोलू देत नाहीत. परंतु, सुषमा अंधारे यांच्याकडून ही मोठी चूक झाली.
कारण धंगेकर हे विधानसभेचे आमदार आहेत आणि निलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.
त्यामुळे त्यांनी धंगेकरांना न बोलू देण्याचा प्रश्नच येत नाही. दोन्ही सभागृह वेगळी आहेत.
दरम्यान, अंधारे यांनी आपल्या पत्रात अनवधनाने झालेली ही चूक कबुल केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Will Ashok Chavan Join BJP? | अशोक चव्हाण भाजपात जाणार? भाजपा खासदाराच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा

Swargate To Katraj Metro | स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करा – अजित पवार

Attack On Retired Police Inspector In Pune | पुण्यात निवृत्त पोलिस निरीक्षकावर प्राणघातक हल्ला,
दगडाने मारहाण, प्रकृती चिंताजनक

Gangadham Hilltop Hill Slope Zone | गंगाधाम येथील हिलटॉप, हिलस्लोपवरील बेकायदा शोरूम्स, गोदामांविरोधात मनपा प्रशासन मोहीम उघडणार

महिलेला बस सुरु करण्यास सांगणे बेतले जिवावर, स्कूल बसचे चाक अंगावरुन गेल्याने चालकाचा मृत्यू;
चाकण येथील घटना

Pune News | पुण्यातील मद्यप्रेमींना शासनाकडून खुशखबर, ‘या’ तीन तारखांना पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार बीअर बार