Manoj Jarange Patil | राजकीय आरक्षणावर जरांगेंची थेट भूमिका, जे ओबीसींना मिळते ते सगळे आम्हाला मिळालेच पाहिजे

जालना : आमच्या आहेत, त्या सर्व सुविधा आम्हाला मिळाव्यात. जे ओबीसींना (OBC) मिळते ते सर्व आम्हाला मिळायलाच हवे, अशी आक्रमक मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यास महायुतीमधील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी थेट विरोध दर्शवला आहे. भुजबळ वारंवार आपला विरोध आक्रमक पद्धतीने मांडत आहेत. त्यातच जरांगे यांनीसुद्धा अशा प्रकारची मागणी केल्याने भुजबळ-जरांगे (Manoj Jarange Patil) वाद वाढण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे यांनी म्हटले की, जे आमचच्या हक्काचे आहे ते आम्हाला मिळणारच ना. पण त्यांनी त्यांची भूमिका निश्चित करावी की, त्यांचा विरोध नेमका कशाला आहे? आम्ही कसे सांगायचे? आमचे आहे, ते आम्हाला मिळणारच आहे. पूर्वीपासून ओबीसी असल्याने सर्व हक्क आम्हाल मिळणारच आहेत. राज्यावर आणि केंद्रावरही.

राजकीय आरक्षणाबाबत जरांगे म्हणाले, आमच्या आहेत त्या सर्व सुविधा आम्हाला मिळाव्यात. जे ओबीसींना मिळते ते सर्व आम्हाला मिळायलाच हवे.

मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाचे सर्वाधिक वाटोळे मराठा समाजाच्या नेत्यांनीच केले.
मुख्यमंत्री असले म्हणून काय झाले. आमचे वाटोळे करून ते मुख्यमंत्री व्हायला लागले, मंत्री व्हायला लागले.
त्यांनी साथ दिली नाही, म्हणून तर आमचे एवढे वर्षं आरक्षण होते, ते त्यांनीच घालवले. त्यांनीच लोकांना वाटप करून टाकले.

राज्य सरकार आणि मराठा नेत्यांना इशारा देताना जरांगे म्हणाले, २४ डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण मिळाले नाही,
तर गेल्या २० वर्षांपासून कोण-कोण ओबीसीमध्ये आहेत त्यांची नावे आणि आपले आरक्षण कुणी दिले? त्यांची नावेही
आम्ही समोर आणणार आहोत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Accident News | दुर्दैवी ! सांगलीच्या जवानाचा अपघातात मृत्यू

Pune Crime News | बांधकाम व्यवसायिकाची फसवणूक, महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल; पिंपरी चिंचवडमधील प्रकार

Chhagan Bhujbal | भुजबळांचा गंभीर आरोप, कुणबी प्रमाणपत्र घेऊन यायचे आणि ओबीसींना बाहेर ढकलायचे…