Pune Pimpri Chinchwad Crime News | अटक टाळण्यासाठी सराईत गुन्हेगाराने पोलीस पथकावर सोडले पाळीव श्वान, पुण्यातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | सराईत गुन्हेगाराला अटक (Arrest) करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या (Pune Police) पथकावर पाळीव श्वान सोडले. हा धक्कादायक प्रकार मुळशी तालुक्यातील रिहे गावात रविवारी (दि.24) घडला आहे. अखेर पोलिसांनी वनविभागाला याची माहिती दिली. यानंतर पोलीस पथकाने आरोपीला अटक (Arrest) केली. मंगेश नामदेव पालवे (वय-32 रा. रिहे, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश पालवे विरुद्ध खून (Murder), खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का कारवाई MCOCA (Mokka Action) केल्यानंतर तो येरवडा कारागृहात (Yerawada Jail) होता. दरम्यान, न्यायालयाने त्याला नुकताच जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. परंतु, बाहेर आल्यानंतर त्याने शनिवारी (दि.23) रिहे गावात एकाला पिस्तुलाचा धाक दाखवून 11 हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. याबाबत पौड पोलीस ठाण्यात (Paud Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यात पालवे याला पकडण्यासाठी पौड पोलीस ठाण्यातील पथक राही गावात गेले होते. पोलिसांच्या पथकाला पाहून आरोपीने पाळीव श्वान पोलिसांच्या अंगावर सोडले. श्वान पथकावर धावून गेल्याने त्याला पकडता आले नाही. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पाळीव श्वान सोडल्यानंतर पालवे याने खिडकीच्या काचेने स्वत:वर वार केले. बिअरची बाटली डोक्यात फोडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अखेर श्वानाला पकडण्यासाठी वनविभागाच्या (Forest Department) पथकला बोलवण्यात आले. पोलिसांनी पालवे याला शरण येण्याचे आवाहन केले. शरण आला नाही तर गोळीबार करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अखेर आरोपी मंगेश पालवे पोलिसांना शरण आला. त्याच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ashok Chavan | अशोक चव्हाण वंचितच्या इंडियातील समावेशावर म्हणाले, ”माझी व्यक्तिगत भूमिका आहे की…”

Health Benefits of Guava | थंडीत का सेवन करावा पेरू? ९९% लोक ‘खावा की खाऊ नये’ याबाबत असतात कन्फ्यूज!

Pune Lok Sabha | ‘है तैयार हम…’ ! लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत; लाखोंच्या उपस्थितीत नागपूर महारॅलीत रणशिंग फुंकणार – माजी आमदार मोहन जोशी

कोरेगाव पार्क, खडकी परिसरात घरफोडी, 14 लाखांचा ऐवज लंपास