Shalini Patil | शालिनीताई पाटलांचे धक्कादायक वक्तव्य, अजित पवार ४ महिन्यांत तुरुंगात जाणार, एकनाथ शिंदेबद्दल म्हणाल्या…

मुंबई : तुरुंगात गेलेल्या माणसाला निवडणुकीला उभे राहता येणार नाही. पुढील ४ महिन्यांत अजित पवार (Ajit Pawar) तुरुंगात जातील. त्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याची अजिबात शक्यता नाही. अजित पवार तुरुंगात गेल्यावर तिथे त्यांना भेटायलाही कोणी जाणार नाही, असे धक्कादायक वक्तव्य शालिनीताई पाटील (Shalini Patil) यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना केले. शालिनीताई पाटील (Shalini Patil) या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आहेत.

शालिनीताई पाटील म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुढील मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसतील. कारण, शिंदे पक्ष फोडून बाहेर पडले आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena), बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नावाने निवडून आले आहेत. ते सत्तेसाठी तिकडे गेले आहेत. त्यांना सरकार चालवता येत नाही.

(Shalini Patil) शालिनीताई पाटील पुढे म्हणाल्या, राज्यात याचे बंड, त्याचे बंड, ग्रामसेवकांचे प्रश्न, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, मराठवाड्यातला दुष्काळ, कांदा आणि ऊसाचा प्रश्न, अशा कुठल्याही प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांना तोडगा काढता आलेला नाही.

शालिनीताई पाटील म्हणाल्या, यंदा महाराष्ट्रात कांद्याचे गरजेपेक्षा जास्त उत्पादन झाले.
हा कांदा निर्यात करायला हवा. परंतु, केंद्राने निर्यातबंदी लागू केली आहे.
ही निर्यातबंदी उठवण्याबाबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी १० वेळा शब्द दिला.
ते दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांना भेटायला गेले.
पण शाहांनी त्यांची भेट घेतली नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ashok Chavan | अशोक चव्हाण वंचितच्या इंडियातील समावेशावर म्हणाले, ”माझी व्यक्तिगत भूमिका आहे की…”

Health Benefits of Guava | थंडीत का सेवन करावा पेरू? ९९% लोक ‘खावा की खाऊ नये’ याबाबत असतात कन्फ्यूज!

Pune Lok Sabha | ‘है तैयार हम…’ ! लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत; लाखोंच्या उपस्थितीत नागपूर महारॅलीत रणशिंग फुंकणार – माजी आमदार मोहन जोशी

कोरेगाव पार्क, खडकी परिसरात घरफोडी, 14 लाखांचा ऐवज लंपास