हवामान विभागाचा सुखद सांगावा ! मॉन्सूनचे केरळला 31 मेला होणार आगमन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शभरात यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडणार असल्याची सुखद वार्ता दिल्यानंतर आज हवामान विभागाने आणखी एक सुखद सांगावा धाडला आहे. येत्या ३१ मे रोजी मॉन्सूनचे केरळला आगमन होणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. यामध्ये ४ दिवस पुढे मागे होऊ शकते, असे या अंदाजात म्हटले आहे.

सर्वसाधारणपणे मॉन्सूनचे आगमन १ जून रोजी केरळवर होत असते. गेल्या वर्षी २०२० मध्ये हवामान विभागाने १ जून रोजी मॉन्सून येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात त्याचे ५ जून रोजी आगमन झाले होते. हवामान विभागाकडून दरवर्षी १५ मे रोजी मॉन्सूनच्या केरळमधील आगमनाविषयीचा अंदाज जाहीर करण्यात येतो. यंदा तो १४ मे रोजी जाहीर करण्यात आला आहे.

दक्षिण अंदमान समुद्रात सर्वसाधारणपणे २० मेच्या आसपास मॉन्सूनचे आगमन होत असते. यंदा दक्षिण अंदमान समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात मॉन्सून२१ मेपर्यंत आगमन होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अंदमान समुद्रात २२ मे रोजी मॉन्सून स्थिरावेल. सध्या अरबी समुद्रात चक्रीवादळ आले असल्याने मॉन्सूनच्या आगमनाला बळकटी येणार आहे.

गेल्य पाच वर्षात केरळमध्ये मॉन्सूनचे झालेले आगमन व हवामान विभागाने जाहीर केलेला अंदाज
वर्ष प्रत्यक्षात दाखल हवामान विभागाचा अंदाज

२०१६ ८जून ७ जून
२०१७ ३० मे ३०मे
२०१८ २९ मे २९ मे
२०१९ ८ जून ६ जून
२०२० ५ जून १ जून