ATS ने केलं स्पष्ट; सचिन वाझेला व्हायचं होतं ‘Supercop’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबईतील व्यापारी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी आणि वादग्रस्त सचिन वाझे यांच्या प्रकरणावरून राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तर व्यापारी मनसुख हिरेनच्या कथित हत्या प्रकरणाचा गुंता सुटल्याचा असा दावा करत राज्य दहशतवादविरोधी पथक (ATS) ने दोन जणांना अटक केली आहे. आणि ATS ने निलंबित API सचिन वाझेला मुख्य आरोपी केले आहे. तसेच ATS ने एक पोलिस शिपाई आणि एका सट्टेबाजाला आहे. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार निलंबित API सचिन वाझेची या प्रकरणात मुख्य भूमिका होती आणि वाझे मुख्य आरोपी म्हणून समोर आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे निलंबित पोलीस शिपाई विनायक शिंदे (वय,५१)आणि बुकी रमणिकलाल नरेश गोर (वय, ३१) असे त्यांची नावे असून, त्यांना ATS ने रविवारी अटक केली. शिंदे हा २००६ मध्ये झालेल्या लाखन भैया बनावट चकमकीतील दोशी आहे. तर तो मागच्या वर्षी फर्लोंवर तुरुंगातून बाहेर आला आहे. तेव्हापासूनच शिंदे वाझेंच्या संपर्कात होता. तसेच, मनसुखच्या हत्येवेळी सचिन वाझे उपस्थित नव्हते, शिंदे २०२० मे महिन्यापासूनच सेवानिवृत्त एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या टीममध्ये वाझेसोबत काम करत होता. या प्रकरणात आणखी एकही पोलिसांचा सहभाग असल्याचा संशय आहे असेब ATS ने म्हटलं आहे.

दरम्यान, नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ATS च्या मते, सचिन वाझेनेच कथितरित्या मनसुख हिरेनला मारायला सांगितले होते. परंतु, हत्येच्या वेळी तेथे वाझे स्वतः उपस्थित नव्हते. एटीएसने वाझे आणि इतरांनी मनसुखसोबत साधलेल्या संवादाच्या फोन रेकॉर्डच्या आधारे ATS ने संशयितांना पकडले आहे. तर गोर आणि शिंदे यांना एटीएस न्यायालयात हजर करण्यात आले. येथे त्यांना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. बुकी गोरने ५ सिम कार्ड विकत घेतले होते आणि ते शिंदेला दिले होते. ही केवळ सुरुवातच आहे. एक-दोन दिवसांत आणखी संशयितांना अटक करण्यात येईल. असे ATS प्रमुख जयजीत सिंह यांनी म्हटले आहे.

तसेच अटक केलेल्या या २ आरोपींनी आपल्यावरील आरोप स्वीकारलेले नाहीत. परंतु, वाझे आणि अन्य काही पोलीस कर्मचाऱ्यांवर स्पष्टीकरण करण्यात आले आहेत. सचिन वाझेने मनसुखला स्फोटकं ठेवण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, त्याने नकार दिला होता. सचिन वाझेच्या टेरर केस तयार करण्यामागे दोन थेअरीदेखील पुढं आल्या आहे. असे अधिकाऱ्याने म्हटले आहे. तसेच एका अधिकाऱ्याने म्हटले आहे, की ‘स्वतःच केस सॉल्व करून सुपरकॉप बनण्याची वाझेची इच्छा होती किंवा ते व इतर काही पोलीस कर्मचारी, एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह, एका प्रायव्हेट सिक्यॉरिटी फर्ममध्ये सामिल होण्याची इच्छा होती. ही फर्म एका कॉर्पोरेटने तयार केली आहे. तर प्राथमिक तपासानुसार, वाझे यांना भीती वाटत होती, की हिरेन त्यांच्या प्लॅनसंदर्भात सर्व काही उघड करेल. म्हणून त्याला मारण्याचा प्लॅन तयार करण्यात आला हिरेनला मारण्याचा प्लॅन २ मार्चलाच तयार करण्यात आला. एवढेच नाही, तर वाझेने याबाबत २ सहकाऱ्यांसह क्रॉफर्ड मार्केट येथील आपल्या हेडक्वॉर्टरमध्ये २ तास चर्चा केली होती.

दरम्यान, शिंदेने हिरेनला उपनगर कांदीवली येथून ४ मार्चला कॉल केला होता आणि आपण ‘तावडे साहेब’ असल्याचे सांगितले होते. यानंतर २ दिवसांनीच मनसुख यांचा मृतदेह हस्तगत करण्यात आला. मनसुख हिरेन ४ मार्चला ठाण्यातील आपल्या घरून निघाले होते आणि पत्नी विमला यांना सांगितले होते, की त्यांना कांदीवली येथे ‘तावडे साहेबां’नी चौकशीसाठी बोलावले आहे. असे एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितली आहे.