Mansukh Hiren case : ‘या’ भाजपा आमदाराची NIA कडे मागणी; म्हणाले – ‘अटक सुनील माने यांच्या शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाण्याचे प्रसिद्ध व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले क्राईम ब्रांचचे पोलीस अधिकारी सुनील माने यांचे अनेक नातेवाईक हे शिवसेनेत कार्यक्षम आहे. तर त्यांची बहीण आणि त्यांचे पती हे तर शिवसेना पक्षाचे नगरसेवक होते, यामुळे पोलीस अधिकारी सुनील माने यांचा शिवसेनेच्या नेत्यांशी देखील जवळीक संबंध असल्याने त्यांचा शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी करावी अशी मागणी आज भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी NIA महासंचालकांना पत्राद्वारे केलीय.

अतुल भातखळकर म्हणाले, PMC बँक घोटाळ्यात ज्या शिवसेना नेत्यांना कर्ज मिळाली त्या शिवसेनेची देखील सुनील माने यांचा जवळीक संबंध होता. म्हणू, मनसुख हत्या प्रकरणाची चौकशी दरम्यान सुनील माने यांच्या शिवसेना कनेक्शनची सुद्धा चौकशी व्हावी, त्यावेळी ‘दूध का दूध, और पाणी का पाणी’ होण्याची आवश्यकता असल्यानेच चौकशीबाबत आज NIA विभागाला पत्र लिहून मी मागणी केली आहे, असे भातखळकर यांनी सांगितले आहे.

या दरम्यान, व्यापारी मनसुख हिरेन यांना पोलीस अधिकारी तावडे या नावाने फोन करून घराच्याबाहेर बोलविल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सुनील माने यांना अटक केली होती. तर माने यांचा शिवसेनेशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुनील माने यांची बहीण ही मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथून नगरसेविका होती तर सुनील माने यांच्या त्या बहिणीचे पती हे तर शिवसेनेकडून ४ वेळा नगरसेवक होते. तसेच माने यांचे सख्खे बंधू देखील आणि त्यावेळी नगरसेवक असलेले त्याच्या बहिणीचे पती यांनी पत्रा चाळीतील नागरिकांना घरे रिकामी करण्यासाठी दमदाटी करण्याचा प्रकार देखील केला होता, त्या प्रकरणात सुनील माने यांचा देखील सहभाग होता.