‘पगडी’ वरून बरीच मंडळी रागवली, मात्र कोणाचेही मन दुखवण्याचा हेतू नव्हता : शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

जीवनात शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे माझे आदर्श असून त्यांचे विचार आणि जीवन मी नेहमी मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. महात्मा फुले यांच्या पगडीवरून बरीच मंडळी रागवली आहेत. यामध्ये कोणाचेही मन दुखवण्याचा प्रयत्न नव्हता. या पुण्यात वाढलो घडलो असून मला या शहराचा अभिमान आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यातील कार्यक्रमात व्यक्त केले.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने पद्मावती येथील डॉ कदम डायग्नोस्टिक सेंटर आणि स्वामी विवेकानंदाचे भिंती शिल्पाचे उद्घाटन  शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कामगार नेते बाबा आढाव, महापौर मुक्ता टिळक, खासदार वंदना चव्हाण,विरोधी पक्षनेते चेतन तुपे आणि स्थानिक नगरसेविका अश्विनी कदम, नितीन कदम, सुभाष जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, समतेचा परिवर्तनाचा आणि विज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा फुले यांचा विचार पुढे नेण्याची ही सामाजिक आणि राष्ट्रीय गरज आहे. शाहू महाराजाची पगडी सामान्यांना उपलब्ध होत नाही. तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशात हॅट वापरली असेल मात्र दैनंदिन जीवनात टोपी घालत नव्हते. म्हणून सर्वांसाठी महात्मा फुले यांचे ‘पगडी घातल्याचे त्यांनी सांगितले.

महापौर मुक्ता टिळक यांना पवारांना विचारले की, तुम्हाला कार्यक्रमामध्ये मिळालेल्या भेट वस्तू काय करता, त्यावर पवार म्हणाले की, त्या भेट वस्तू ठेवण्यासाठी माझ्याकडे जागा नाही, असे त्यांनी सांगितले. राज्य घटना ही देशाचा आत्मा आहे. ती दिशा दाखवण्याचे काम करते म्हणून यापुढे कार्यक्रमामध्ये असे विचार असलेली पुस्तके आणि आदर्श व्यक्तीची पुस्तके लोकांना भेटू वस्तू स्वरूपात देण्याची गरज आहे.

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 80 वर्षानंतर मुलींना प्रवेश देण्यात आला आहे. हा स्त्री शिक्षणाचा दृष्टिकोन आहे. तसेच एस एम जोशी यांनी जात पात कधी पाहिली नाही. मुलींना आरक्षण ठेवण्याचा मुद्दा विधी मंडळात ठेवला आणि तो राबवला. त्यातून महिलांना कर्तृत्वाची संधी मिळाली आहे.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावावरून बोलताना जेष्ठ कामगार नेते बाबा आढाव म्हणाले की,सावित्रीच्या लेकींना संधी दिल्यावर त्या धडाडीने कशा पुढे जाऊ शकतात त्याचे उदाहरण म्हणजे अश्विनी कदम या आहेत.त्यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शरद पवार यांचा महात्मा फुले यांचे पागोटे घालून सन्मान केला. तर सावित्रीबाई फुले यांचे स्मृती चिन्ह भेट दिले.पवार यांनी पागोटे दिले.त्यावरून बरीच चर्चा झाली.मात्र कोणी जर या पागोट्याला जातीचे प्रतीक मानत असतील.तर ती माणसे मनाने कोत्या मनाची आहेत.पागोट्या मागच विचार महत्वाचा आहे. जीवनात सत्याचा शोध घेण्याचा अधिकार सर्वाना आहे.प्रत्येक माणसाला आहे.आम्हाला ब्रह्मज्ञान झाले आहे.असे कोणी म्हणत असतील तर तो लोकशाही चा अपमान आहे.समाजला फुले यांनी नुसते पागोटे दिले नाही तर समतेचा संदेश दिला.संविधाना प्रमाणेच समतेचे राज्य चालणार आहे.त्यासाठी मुलावर चांगल्या संस्काराची गरज आहे. त्यामुळे पवार यांनी उल्लेख केलेले पागोटे समर्थनीय असल्याची भूमिका त्यांनी मांडली. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीने निम्या जागावर महिलांना संधी द्यावी.अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त  केली.

ते पुढे म्हणाले की, लग्न कार्यात आणि इतर समारंभात फेट्याचा रंग वाढला आहे. तो कमी करायला हवा.अशी अपेक्षा व्यक्त करीत ते पुढे म्हणाले की, पुण्यापेक्षा मुंबई महापालिका खूप पुढे आहे. त्यांचे स्वतः चे वैद्यकीय महाविद्यालय आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने ससूनच्या धर्तीवर स्वतः हॉस्पिटल उभारून पुढे घौडदौड करावी. शहरात नव्या पिढीला खेळण्यास जागा नाही झोपडपट्ट्यांचे प्रमाण वाढत आहे यावर लक्ष देण्याची गरज आहे.