दुर्देवी ! अपहरणानंतर माओवाद्यांनी केली जवानाची हत्या; परिसरात दहशतीचं वातावरण

पालनार : वृत्तसंस्था – छत्तीसगड येथील बिजापूर जिल्ह्यातील पालनार येथून माओवाद्यांनी ३ दिवसापूर्वी एका पोलीस उपनिरीक्षकाच अपहरण केलं होत. त्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आलीय. यानंतर माओवाद्यांनी त्यांचा मृतदेह गंगलूरच्या रस्त्यावर फेकून दिला. अशी एक दुर्देवी घटना घडली आहे. आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुरली ताती असे त्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी, बीजापूर याठिकाणी ३ एप्रिल रोजी भारतीय जवानांवर नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये २२ भारतीय जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर माओवाद्यांनी अपहरण करून, पोलीस उपनिरीक्षकाची (जवान) हत्या केली. यावरून आता तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी त्या जवानाच्या कुटूंबीयांनी मीडियाच्या माध्यमातून सुटका करण्याची मागणी देखील केली होती. परंतु, माओवाद्यांनी जन अदालतमध्ये त्यांची हत्या घडवून आणली आहे. यासंदर्भातचे १ पत्र देखील माओवाद्यांच्या पश्चिम बस्तर विभागीय समिती कडून जारी करण्यात आले. या हत्येवरून त्या ठिकाणी दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, गेल्या काही काळापासून छत्तीसगड येथे नक्षलवादी हल्ल्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. यामुळे भारतीय जवानांचा अनावश्यक बळी जाताना दिसत आहे. तर, माओवाद्यांनी ३ दिवसांपूर्वीही छत्तीसगड राज्यातील एका पोलीस स्टेशनवर जबरदस्तीने हल्ला करण्यात आला. यावेळी माओवाद्यांनी जांबिया पोलीस ठाण्यावर गोळीबारासोबतच ग्रेनेडचा माराही केला आहे. तर बुधवारी मध्यरात्री झालेल्या या हल्ल्याला पोलिसांनीही गोळीबार करत प्रत्युत्तर दिलं आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, यावेळी मोठा कट करून हत्याकांड करण्याचा माओवाद्यांचा विचार होता.