कायगाव टोका येथील मराठा आंदोलन मागे

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुलावरुन गोदावरी नदीत उडी मारुन काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या केल्यानंतर आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला संमीश्र प्रतिसाद मिळाला असून काही ठिकाणी जाळपोळीच्या आणि दगडफेकिच्या घटना घडल्या आहेत. कायगाव टोका येथे आंदोलकांनी सुरु केलेले आंदोलन आज (मंगळवार) मागे घेण्यात आले.

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’83f1bacd-8f46-11e8-b045-f9e3893f7e93′]

काकासाहेब शिंदे यांच्या आत्महत्ये केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चानं आंदोलन तिसऱ्या दिवशी अधिक तीव्र केले. आज महाराष्ट्र बंदची हाक दिली असली, तरी यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या. तसेच आंदोलकांनी बसेसवर दगडफेक करू नये, अशा सूचना समन्वयकांनी दिल्या आहेत. काल दुपारपासून सुरू असलेलं कायगाव टोका येथील आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. कालपासून औरंगाबाद-पुणे महामार्ग बंद होता