Maratha Reservation | मराठा समाजासाठी काय केले ते आक्रमकपणे मांडा; भाजपच्या मराठा आमदारांना बैठकीत सूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maratha Reservation | मराठा समाजासाठी (Maratha Community) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारने आणि सध्याच्या शिंदे सरकारने (Mahayuti Govt) खूप काही केले. पण ते मराठा समाजातील लोकांना समजावण्यात आपण कमी पडलो. यापुढे आक्रमकतेने त्याबाबतची बाजू मांडा अशी सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मराठा समाजातील आमदारांच्या (Maratha MLA Meeting) बैठकीत मांडली.

सरकारने दिलेले आरक्षण कोर्टात टिकणार नाही असे फेक नॅरेटिव्ह तयार करून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अपप्रचार केला. आरक्षण टिकण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न आपले सरकार सर्वोच्च न्यायालयात करत आहे. कुठलीही कसर आपण सोडलेली नाही. असे असताना आपल्याबाबत बुद्धिभेद करण्यात महाविकास आघाडीचे नेते यशस्वी झाले. त्याला प्रत्युत्तर देण्यात आपण कमी पडलो, असे बावनकुळे म्हणाले.(Maratha Reservation)

सारथीच्या माध्यमातून आपल्या सरकारने मराठा समाजाच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या, तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवण्यात आल्या. हे सगळे आपण समाजात सांगितले पाहिजे त्या दृष्टीने कामाला लागा, असे आवाहन पाटील आणि बावनकुळे यांनी केले.

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या नाराजीचा फटका आपल्याला बसला. या समाजासाठी खूप काही करूनही केवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खोटे पसरविले. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत त्यांचा अजेंडा पुन्हा यशस्वी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sinhagad Road Pune Crime News | पुणे: सिंहगड रस्ता परिसरात आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Chandan Nagar Pune Crime News | पुणे: तुमच्यावर मनी लाँड्रींगची केस! चौकशीची भीती घालून सायबर गुन्हेगारांकडून महिलेला 13 लाखांचा गंडा

Sinhagad Express | मोटरमनने वेगमर्यादा न पाळल्याने सिंहगड एक्सप्रेस पकडताना प्रवाशाचा मृत्यू

Harshvardhan Patil On Sugar Export | साखर उत्पादनाचा अंदाज चुकल्यानेच केंद्राची निर्यातीवर बंदी; हर्षवर्धन पाटलांची कबुली