Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत माजी मुख्यमंत्र्यांची नवी मागणी, बिहारसारखी महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maratha Reservation | जे बिहारमध्ये शक्य आहे ते महाराष्ट्रात का नाही? राज्य विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात (Winter Session) महायुती सरकारने महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत पावले उचलावीत; जेणेकरून मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होऊ शकेल, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे (Maratha Reservation in Maharashtra, Ashok Chavan).

बिहार विधानसभेने आरक्षणाची (Maratha Reservation) मर्यादा ७५ टक्के करण्याबाबतचे विधेयक काल मंजूर केले. यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांनी वरील मागणी केली आहे. बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी राज्यातील महायुती सरकारकडे केली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, बिहारच्या या विधेयकाला तेथील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे. देशात जातनिहाय जनगणना करावी आणि आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी, ही भूमिका काँग्रेस (Congress) पक्षाने अगोदरच स्वीकारली आहे. हैद्राबाद व नवी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत तसे ठरावही मंजूर केले आहेत. राज्य सरकारने याबाबत पुढाकार घ्यावा, असे चव्हाण म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुण्यातील सहवर्धन समूहाने सियाचीनमधील जवानांसाठी पाठवल्या ५०० गरम टोप्या, देशसेवेचा अनोखा उपक्रम

Devendra Fadnavis On Muralidhar Mohol Birthday | वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनीच साजरा व्हावा : देवेंद्र फडणवीस

Samvidhan Samman Daud In Pune | भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ‘संविधान सन्मान दौड 2023’ चे आयोजन

Chandrakant Patil Visit Bajirao Peshwa Statue | बाजीराव पेशव्यांचा इतिहास तरुण पीढीला प्रेरणादायी – चंद्रकांत पाटील

Sharad Pawar-Ajit Pawar | दिवाळीतील गाठीभेटी! पवार-वळसे भेटीनंतर काका-पुतण्या आले एकत्र

PM Kisan Yojana | खुशखबर! किसान योजनेचा १५ वा हप्ता ‘या’ दिवशी येणार, दिवाळी होणार गोड

Pune Drug Case | ललित पाटील ड्रग्स रॅकेट प्रकरणात जप्त केलेल्या 8 किलो सोन्याच्या व्यवहाराबद्दल पुणे पोलिस कळविणार आयकर आणि जीएसटी विभागाला

Dr Sanjeev Thakur-Sassoon Hospital | अखेर वादग्रस्त ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना अधिष्ठातापदावरुन हटवलं, उच्च न्यायालयाचा निकाल