Maratha Reservation | ‘आम्ही मराठा समजाला काहीही थातुरमातूर देणार नाही’, मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान (व्हिडीओ)

भीमाशंकर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) राज्य सरकार (State Government) कोणताही निर्णय घाईगडबडीत घेणार नाही. हा निर्णय घाईगडबडीत घेतला आणि न्यायालयात त्याला स्थगिती मिळाली तर ती फसवणूक ठरेल. राज्य सरकार कोणालाही फसवू इच्छित नाही. सरकारला मराठा समाजासाठी थातुरमातूर किंवा तात्पुरतं काम करायचं नाही. मराठा समाजाला त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे आम्ही जे करु ते कायदेशीर, चांगली फळं देणारं आणि समाजाला फायदा देणारं असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर येथे माध्यमांशी ते बोलत होते. (Maratha Reservation)

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका सविस्तरपणे सांगितली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी आम्ही आरक्षण दिलं होतं. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ते रद्द झालं. मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणीक मागास सिद्ध करणं हे पहिलं काम आहे. त्याला आम्ही प्राधान्य देत आहोत. त्यावर डेडीकेशन कमीशन, कमिटी सगळे काम करत आहेत. सरकारला थोडा अवधि द्यायला पाहिजे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना देखील मी विनंती वजा आवाहन केलेलं आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. (Maharashtra Politics)

स्वतंत्र आरक्षण देण्याची आमची भूमिका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, इतर समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. मराठा समाजाला सर्व समन्वयकांनी याची नोंद घ्यावी. आमचं सरकार हे निर्णय घेणार सरकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती तेव्हा पूर्वी निवड झालेल्या 3700 मराठा उमेदवारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या होत्या. परंतु, त्यांना आम्ही नोकऱ्या दिल्या.

आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर टिकणार पाहिजे

राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सकारात्मक आहे. ओबीसी समाजाला मिळणारे सर्व लाभ आपण मराठा समाजाला देत आहोत. सारथी, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, परदेशी शिक्षणासंदर्भातील आर्थिक मदत, अशा सगळ्या गोष्टी मराठा समाजाला मिळत आहेत. मराठा आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर टिकणार असलं पाहिजे. कायद्याच्या चौकटीत त्याला बाधा येता कामा नये, ही आमची भूमिका असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

सर्वांनी सहकार्य़ाची भूमिका घेतली पाहिजे

त्यामुळे आता राज्यातील सर्व पक्षांनी मराठा आरक्षणासंदर्भात सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे.
त्यासाठीच आजची बैठक बोलावली आहे. त्यांनी मराठा समाजाला न्याय मिळेल, अशा सूचना द्याव्यात.
हा राजकारणाचा विषय नाही तर समाजकारणाचा विषय आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | कार्बनीकरण कमी करण्याचा उद्योजक,तंत्रज्ञ,अभियंत्यांचा निर्धार

Bharati Vidyapeeth New Law College | भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या वतीने ‘ग्राहक संरक्षण कायदे’ विषयावर कार्यशाळा