Maratha Reservation | मराठा समजाला पुन्हा धक्का! हायकोर्टाकडून ‘तो’ जीआर रद्द; मराठा समाजातील तरुणांच्या अडचणी वाढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न प्रलंबित असल्याने राज्यातील मराठा समजातील तरुणांना तात्पुरता दिलासा देण्यासाठी एसईबीसी प्रवर्ग अंतर्गत लागू करण्यात आलेले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थात EWS आरक्षणाचा लाभ रद्द करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) शुक्रवारी (दि.29) यासंदर्भातील शासन आदेश (GR) रद्दबातल ठरवला आहे. हा मराठा समजासाठी (Maratha Reservation) मोठा धक्का मानला जात आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता (Chief Justice Dipankar Dutta) व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक (Justice Makarand Karnik) यांच्या खंडपीठाने याचिकांवरील सुनावणी नंतर 6 एप्रिल 2020 रोजी राखून ठेवलेला निर्णय आज जाहीर करताना 23 डिसेंबर 2020 रोजी काढलेला जीआर रद्द केला आहे.

 

मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) प्रथम स्थगिती आल्यानंतर मराठा उमेदवारांना EWS प्रवर्गाच्या 10 टक्के आरक्षणात सामावून घेत महावितरणच्या नोकर भरती (Mahavitaran Recruitment) प्रक्रियेत सहभागी होण्याची मुभा राज्य सरकारने दिली होती. यासंदर्भतच्या राज्य सरकारच्या जीआरला EWS प्रवर्गातील अनेक उमेदवारांनी याचिकांद्वारे आव्हान दिले होते. त्यांच्या याचिका आज मुंबई हायकोर्टाने मान्य करत जीआर रद्द केला. त्यामुळे मराठा समाजातील उमेदवारांना पुन्हा एकदा फटका बसला आहे. यानंतर आता मराठा समाजात काय प्रतिक्रिया उमटते हे पहावे लागेल.

मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण कायद्याला (Reservation Act) सुप्रीम कोर्टाने 9 सप्टेंबर 2020 रोजी स्थगिती दिली होती.
यानंतर तात्पुरता उपाय म्हणून केंद्र सरकारने (Central Govt) खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी
लागू केलेल्या दहा टक्के आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी मराठा समाजाला ते आरक्षण लागू केले.
कालांतराने सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्दबातल ठरवला. आता EWS च्या आरक्षणाचा लाभ देणारा जीआर देखील रद्द झाल्याने मराठा समाजातील तरुणांच्या अडचणी वाढणार आहेत.

 

Web Title :- Maratha Reservation | maratha community ews benefit under sebc category maharashtra government cancelled by mumbai bombay high court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! एकनाथ शिंदे सरकारचा फैसला पुन्हा लांबवणीवर?

 

Cm Eknath Shinde | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्मुला ठरला?

 

Maharashtra Political Crisis | उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील शिक्षकाचा राजीनामा, राजीनामा पत्र व्हायरल